-rat१८p१४.jpg-
२५O०५१३४
खेड ः मुख्याधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची झालेली दुरवस्था.
---
खेड मुख्याधिकारी निवासस्थानाची पडझड
आठ वर्षे विनावापर पडून : दुरुस्तीअभावी धोकादायक अवस्थेत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १८ : शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूलजवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या शेजारी उभारण्यात आलेले मुख्याधिकारी निवासस्थान सध्या पडझडीच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या आठ वर्षांपासून या शासकीय निवासस्थानाचा वापरच न झाल्याने आणि देखभालीकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याने इमारतीची अवस्था धोकादायक झाली आहे.
मुख्याधिकाऱ्यांसाठी उभारण्यात आलेले हे निवासस्थान खेड नगरपालिका कार्यालयापासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर आहे. उभारणीनंतर काही काळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी येथे राहिले. नंतर कार्यरत असताना मुख्याधिकारी महादेव रोडगे हे या निवासस्थानात वास्तव्यास होते; मात्र त्यांच्या बदलीनंतर इमारत रिकामीच राहिली.
प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सोयीच्या ठिकाणी राहणे पसंत केले. परिणामी, रोडगे यांच्या वास्तव्याखेरीज इतर कोणत्याही मुख्याधिकाऱ्याने या निवासस्थानाचा वापर केलेलाच नाही, अशी माहिती समोर आली आहे. निवासस्थानाच्या छतावरील साहित्य कोसळले असून, संपूर्ण रचना मोडकळीस आली आहे. इमारत कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरीही पालिका प्रशासनाकडून दुरूस्ती, पुनर्बांधणी किंवा जमीनदोस्त करण्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. याबाबत नागरिकांतून आश्चर्य व्यक्त होत आहे. प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला कधी वेळ मिळणार असा सवालही नागरिकांतून सध्या उपस्थित होत आहे.
चौकट
अग्निशमन बंबालाही धोका
निवासस्थानासमोरील मोकळ्या जागेत पालिकेचा अग्निशमन बंब पार्क केला जातो. यासाठी तात्पुरते छप्परही उभारण्यात आले आहे; मात्र पडझडीच्या स्थितीत असलेल्या इमारतीमुळे अग्निशमन बंबालाच धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.