-rat१८p८.jpg-
२५O०५१०१
चिपळूण ः लोटिस्मात राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय संचालिका सरस्वती (ताई) आपटे यांच्या तैलचित्राचे अनावरण करताना ज्येष्ठ चित्रकार रवींद्र देव, राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्री फाटक, उमा दांडेकर, धनंजय चितळे, विनायक ओक आदी.
---
सरस्वतीताई आपटे यांच्या तैलचित्र अनावरण
लोटिस्मात मान्यवरांची उपस्थिती ; कार्याचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १८ ः येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनाकरिता राष्ट्राच्या परमवैभवाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून जीवनभर कार्यरत राहिलेल्या राष्ट्रसेविका समितीच्या द्वितीय संचालिका सरस्वती (ताई) विनायकराव आपटे यांच्या तैलचित्राचे अनावरण वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात झाले.
कार्यक्रमाला पुणे येथील महर्षी कर्वे शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष, संस्कार भारतीचे अखिल भारतीय दृष्यकला संयोजक आणि ज्येष्ठ चित्रकार रवींद्र देव, राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत कार्यवाहिका पद्मश्री फाटक, राष्ट्रसेविका समितीच्या कोकण प्रांत सहकार्यवाहिका उमा दांडेकर, वाचनालयाचे कार्यवाह धनंजय चितळे, सहकार्यवाह विनायक ओक उपस्थित होते.
या प्रसंगी ज्येष्ठ चित्रकार रवींद्र देव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कळण्यासाठी शाखेतच जावे लागते, असे स्पष्ट केले. संघ म्हणजे मातृशक्तीची मांदियाळी असून, ‘ताई’ या शब्दात ‘आई’ लपलेली असते. सरस्वती‘ताई’ या समाजाच्या आई झाल्या होत्या. अशा सरस्वतीताईंचे तैलचित्र काढण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याचे नमूद केले. आपण इथले कलादालन पाहिले. या कलादालनातील व्यक्तिचित्रे भारत-भारतीच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट झाली पाहिजेत, असेही देव यांनी नमूद केले. वाचनालयाचे संचालक धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय चितळे यांनी प्रास्ताविक केले. कार्यवाह धनंजय चितळे आणि सहकार्यवाह विनायक ओक यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दापोलीच्या स्मिता आंबेकर यांनी ताईंच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्पर्श चंदनाचा ताई...’या गीताचे गायन केले.