कोकण

सदर

CD

संतांचे संगती (पसायदान) ः भाग चौथा
(१२ नोव्हेंबर पान २)

सज्जन संख्या वाढवणे म्हणजेच समाजातील दुर्जनांची संख्या कमी करणे होय येथे सज्जनांना शब्दशः संपवणे अपेक्षित नाही. तर त्यांच्या वृत्तीत बदल घडवणे हे अभिप्रेत आहे म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज जे खळांची व्यंकटी सांडो असे म्हणतात. अशी दुष्ट बुद्धी संपलेले सज्जन नुसते घरात बसून राहून समाजाचे भले होणार नाही. म्हणूनच अशा लोकांनी निरपेक्ष भावनेने समाजाच्या उद्धारासाठी कार्यरत व्हायला हवे...!

- rat१९p५.jpg-
25O05333
- धनंजय चितळे
--------
सुखाची गुढी उभारण्यासाठी
हवे सज्जनांचे साह्य


जे खळांची व्यंकटी सांडो | तया सत्कर्मी रती वाढो|
भुता परस्परे जडो| मैत्र जीवांचे||
महाराष्ट्रातील थोर कवी कुसुमाग्रज यांनी पसायदानाबद्दल फार छान लिहिले आहे ते म्हणतात,‘ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या उत्तुंग देवालयावरील कांचनाचा कळस आहे. देवालयाच्या दारापर्यंत ज्यांना पोहोचता येत नाही, ते आकाशात उंचावर गेलेल्या कळसाला दुरून नमस्कार करतात. भल्या मोठ्या ग्रंथाचा एका वाक्यात सारांश काढावा त्याप्रमाणे हा देखाव्याचा सारांश असतो. ज्ञानेश्वरीचा वाचन प्रवास हा हिरे माणसांनी खचलेल्या म्हणजे पुरेपूर भरलेल्या पण पुरेसा प्रकाश नसलेल्या रत्न गुंफेतील वाचन प्रवास आहे. हा प्रवास संपवून आपण पसायदानापाशी येतो तेव्हा चैत्रातील सुंदर सोनेरी सकाळ आपल्या भोवती उजाडते आहे असे वाटते.’ हेच अद्वितीय पसायदान आपण समजून घेत आहोत. खरं म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायात यांची लक्षणे सांगितले आहेत ते म्हणतात जी माणसे पतिव्रता, सत्पुरुष, दानशूर माणसे, याज्ञिक, तपस्वी, संन्यासी, खरे भक्त या सगळ्यांची किंवा श्रीभगवतप्राप्तीसाठी केल्या जाणाऱ्या विविध साधनांची निंदा करतो, त्यांच्याबद्दल द्वेष बुद्धी बाळगतो तो दुष्ट होय. ज्या व्यक्तीवर चांगले संस्कार झालेले नसतात ज्या व्यक्तीची मीपणाची भावना संपलेली नसते. किंवा ज्याला पैसा प्रसिद्धी इत्यादी गोष्टींचा मोह आवरता येत नाही त्या व्यक्तींचे रूपांतर खळांमध्ये होते.
अशा माणसांकडे विद्या धन शक्ती असले तरी त्याचा उपयोग ते इतरांना त्रास देण्यासाठीच करतात उलट सज्जन या सर्वांचा परोपकारासाठी वापर करतो म्हणूनच या परपीडक दुष्टांच्या सामर्थ्याचा उपयोग चांगल्या कारणाकडे करायचा असेल तर त्यांच्या मनात असलेला दुष्टभाव काढून टाकायला हवा श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील ५२ व्या ओवीत असे म्हटले आहे की सुखाची गुढी उभारण्यासाठी मी सज्जनांचे साहाय्य घेईन. सज्जन संख्या वाढवणे म्हणजेच समाजातील दुर्जनांची संख्या कमी करणे होय येथे सज्जनांना शब्दशः संपवणे अपेक्षित नाही तर त्यांच्या वृत्तीत बदल घडवणे हे अभिप्रेत आहे म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराज जे खळांची व्यंकटी सांडो असे म्हणतात. अशी दुष्ट बुद्धी संपलेले सज्जन नुसते घरात बसून राहून समाजाचे भले होणार नाही. म्हणूनच अशा लोकांनी निरपेक्ष भावनेने समाजाच्या उद्धारासाठी कार्यरत व्हायला हवे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दोन गुणांची चर्चा श्री माऊलींनी पुढे केली आहे. ते म्हणतात अशा दुष्ट बुद्धी संपलेल्या माणसांच्या मनामध्ये चांगल्या कर्माविषयी प्रेम निर्माण होऊ दे आणि त्यांना सर्व प्राणिमात्रांविषयी मैत्रभाव वाटू दे. संत रचनांमध्ये मैत्र भावाबद्दल खूप चांगले सांगितले आहे. त्याचे चिंतन पुढील भागात करूया.

(लेखक संत आणि संस्कृतीचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT