कोकण

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी

CD

वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी
चिपळूणमधील प्रकार ; १० हजारांचा फटका
चिपळूण, ता. १९ : चिपळूण शहरातील गोवळकोट रोडवरील लतिफा अपार्टमेंट येथे एका तरुणाने वीज मीटरमध्ये छेडछाड करून वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २८ जून ते १३ नोव्हेंबर २०२५ या दीर्घ कालावधीत झालेल्या या चोरीमुळे महावितरण कंपनीचे १० हजार १७० रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनिवारी चिपळूण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशफाक-ए-गफर मेमन (वय ४०, रा. लतिफा अपार्टमेंट, गोवळकोट रोड) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणाची तक्रार महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता नितीन शंकर कांबळे (५१, पाग-चिपळूण) यांनी नोंदवली आहे. अशफाक मेमन याने वीज मीटरच्या मागील बाजूस ड्रिलने छिद्र पाडून त्यामध्ये तांब्याची वायर ‘लूप’ करून टाकली होती. या छेडछाडीमुळे मीटरची वीज मोजणी कृत्रिमरीत्या कमी वेगात होत असल्याचे कर्मचाऱ्यांना आढळले. या पद्धतीने मेमन याने ९५१ युनिट वीज चोरी केली. ही बाब लक्षात आल्यानंतर सहाय्यक अभियंता नितीन कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार चिपळूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: म्हाडाचे भाडेतत्त्वावरील घरे धोरण मसुदा तयार

SCROLL FOR NEXT