swt1920.jpg
05397
दोडामार्ग ः ''नशा करी जीवनाची दुर्दशा'' या लघु चित्रपटाचे अनावरण करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसुरकर आणि अन्य.
‘नशा करी जीवनाची दुर्दशा’
चित्रफितीतून समाज प्रबोधन
सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १९ : युवा पिढीत अमली पदार्थांचे सेवन दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी तालुक्यातील युवकांनी एकत्र येत अमली पदार्थ सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम आणि त्याचा कुटुंबावर होणारा आघात, याचे समाज प्रबोधन करणारी ‘नशा करी जीवनाची दुर्दशा’ ही लघू चित्रफित बनविली आहे. या चित्रफितीचे अनावरण दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. मसुरकर यांच्या हस्ते झाले.
हा लघू चित्रपट शाळेत, महाविद्यालयात मोफत दाखविण्याची मोहीम युवकांनी हाती घेतली आहे. दोडामार्ग, कुडासे, कळणे, साटेली-भेडशी, पिकुळे शाळा आणि महाविद्यालय विद्यार्थी वर्गाला आतापर्यंत हा लघुपट दाखविण्यात आला आहे. तालुक्यातील इतर उर्वरित शाळेतही हा चित्रपट दाखवून चुकीच्या सवयी, चुकीची मैत्री यामुळे जीवनावर होणारे परिणाम, होणारी हानी मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठी युवक प्रयत्नशील आहेत.