rat19p16.jpg
05406
राजापूरः खड्ड्यामध्ये खडी पसरताना कामगार.
rat19p17.jpg
05407
राजापूरः रस्त्याची साफसफाई करताना कामगार.
----------------
जकातानाका, जवाहरचौकातील खड्डे अखेर भरले
वाहनचालकांना दिलासा; निवडणुकीच्या तोंडावर काम
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १९ : गेल्या काही महिन्यांपासून रखडलेल्या शहरातील जकातनाका जवाहरचौक या मुख्य रस्त्यावरील जकातनाका ते चौगुले मेडीकल या दरम्यानच्या रस्त्याच्या भागामध्ये ठिकठिकाणी मोठ्याप्रमाणात पडलेले खड्डे डांबराच्या सहाय्याने भरण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याला आजपासून सुरवात झाली असून त्यामुळे वाहनचालक, प्रवासी यांसह राजापूरवासीयांना दिलासा मिळाला आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर या कामाला सुरवात केली आहे.
पावसाळी हंगामामध्ये राजापूरवासीयांना खड्ड्यातून प्रवास करावा लागला होता. गणेशोत्सवा दरम्यान, मोठ्याप्रमाणात खड्डे आणि वाहनांसह लोकांची वर्दळ असलेल्या जवाहरचौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यावर जवाहरचौक ते चौगुले मेडीकल या दरम्यानच्या भागामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागातील खड्ड्याची समस्या दूर झाली असली तरी, याच मार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरातील खड्डे जैसे थे होते. राजापूर हायस्कूलसमोरच्या भागामध्येही रस्त्यामध्ये खड्डे पडलेले असून उताराच्या असलेल्या या भागामध्ये रस्त्यावर लहान पसरलेली खडी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत होती. शहरातील मुख्य रस्त्यावरील मोठ्याप्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्याला अखेर मुहूर्त मिळालेला आहे. आजपासून रस्त्यातील खड्डे डांबराच्या साह्याने बुजविण्यास सुरवात झाली आहे.