कोकण

अपक्ष उमेदवारीने खेडमध्ये महायुतीत गोंधळ

CD

अपक्ष उमेदवारीने खेडमध्ये महायुतीत गोंधळ
नगराध्यक्षपदाचा तिढा; भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे धाव
सिद्धेश परशेट्येः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १९ : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत अंतर्गत घडामोडींना उधाण आलेले आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचा परिणाम महायुतीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मनसेचे कोकणातील नेते आणि खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा भाजपप्रवेश तसा सहजासहजी झालेला नव्हता. नगरपालिका निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपूर्वी खेडेकर यांच्या रंगलेल्या प्रवेशनाट्याने राजकीय कल्लोळ सुरू होता. त्यांच्या प्रवेशानंतर भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बळ मिळाले. त्यानंतर जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून थेट नगराध्यक्षपदाचीच मागणी केली होती. या पदासाठी महिला आरक्षण पडल्यामुळे महायुतीकडून शिंदे शिवसेनेच्या माधवी राजेश बुटाला यांना नगराध्यक्षपदाची संधी दिली गेली. त्यांनी अधिकृत उमेदवार म्हणून अर्जही भरला. त्यामुळे भाजपचा पत्ता आपसुकच कापला गेला. त्याचवेळी खेडकर यांच्या पत्नी वैभवी खेडेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. तसेच नगरसेवक पदाच्या केवळ तीनच जागा भाजपला दिल्या गेल्या. जागावाटपातील तडजोडींमध्ये इच्छित प्रगती न झाल्याने भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यामुळे खेडमध्ये महायुतीतील एकजुटीला तडा जाऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना साकडे घातले आहे. उमेदवारी माघारीपर्यंत तोडगा निघाला नाही, तर वैभवी खेडकर काय करणार, यावर पुढील गणिते अवलंबून राहणार आहेत.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सपना ऋषिकेश कानडे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे खेडमध्ये तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झालेली आहे. खेडमध्ये तीनही उमेदवार मैदानात राहिल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलण्याची शक्यता आहे. महायुतीने तिढा सोडवला नाही, तर खेड शहरातील निवडणूक रंगतदार होणार, हे निश्चित.

चौकट
मनसेचे उमेदवार ‘उबाठा’कडून
महाविकास आघाडीत मनसेच्या वाट्याला ४ जागा मिळालेल्या होत्या. मात्र त्या सर्वच जागांवर मनसेचे उमेदवार मशाल चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यामध्ये महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारही मनसेचा असून त्यांनीही ‘उबाठा’ची मशाल हाती घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच महत्त्व येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT