कोकण

मळगावची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

CD

05455

मळगावची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

पारंपरिक सोहळा; ग्रामदेवतेचे घरोघरी भक्तिभावाने पूजन

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १९ ः ‘देव भावाचा भुकेला, भक्तांसाठी धाऊनी आला’ याची प्रचिती मळगावात येत आहे. मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पूर्वचारी देवाच्या उत्सव मूर्तीसह ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला सोमवारपासून (ता. १७) सुरुवात झाली असून, या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. घरी आलेल्या तरंगकाठीचे घरोघरी पारंपरिक पद्धतीप्रमाणे विधीवत पूजन करण्यात येत आहे.
मळगाव गाव आगळ्या वेगळ्या परंपरा जोपासण्यासाठी ओळखला जातो. अशीच एक आगळीवेगळी परंपरा म्हणजे, येथील पंचायतन देवस्थानची तरंगकाठी मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी घरोघरी फिरविण्यात येते. मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सव झाल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरविण्याची प्रथा कित्येक वर्षांपासून चालत आली आहे. तत्पूर्वी ही तरंगकाठी मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने मळगाव येथील रवळनाथ जत्रोत्सव झाल्यावर सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते. तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनुर्ली येथे पाहुणचारासाठी थांबते. तेथे पाहुणचार झाल्यावर सोनुर्ली येथे मळगाव गावचे राऊळ व गावकर आदी मानकरी जातात. तेथे कौलप्रसाद घेऊन पंचायतन मळगावला घेऊन आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरविली जाते. यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते. यासाठी सुमारे पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कुळघराकडून विधीवत तरंगकाठी व पालखीचे पूजन करून ढोल-ताशांच्या गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाडगावकर, जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून गावात तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी घरातील व्यक्तींनी गंध, पुष्प वाहून तरंगकाठीचे पूजन केले. देवीची ओटी भरण्यात आली. काही ठिकाणी सुवासिनींनी तसेच नवविवाहितांनी देवीला साडी अर्पण करून नवसफेड केली. या सोहळ्यात घरातील मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती.
---
असंख्य वर्षांची परंपरा
शुक्रवारपासून (ता. २१) मळगाव गावची मांजरी बसत असल्याने या कालावधीत गावातील सर्वच धार्मिक कार्ये बंद असतात. त्यामुळे उर्वरित गावात मांजरी संपून मायापूर्वचारी व भूतनाथ जत्रोत्सव झाल्यावर तरंगकाठी फिरविण्यात येणार आहे. अशाप्रकारे तरंगकाठीची असंख्य वर्षांची ही परंपरा मळगाव गावचे मानकरी एकोप्याने जोपासत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: प्रदूषणाला रेल्वेचा उत्तरफटका! आता पैसा अन् वेळही वाचणार; भारतीय रेल्वेची नवी वाहतूक क्रांती सुरू, योजना काय?

Pune Court Decision: पतीला जीव देण्यास प्रवृत्त केलं, पत्नीला सात वर्षांची सक्तमजुरी! दुसरा विवाह अन्...

Latest Marathi Breaking News Live Update: शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार - फडणवीस भेट

Akola News : सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करण्याचा डाव; आ. साजिद खान यांचा स्फोटक आरोप

Leopard Attack : दोन बिबट्यांचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला; जीव धोक्यात घालून मेंढपाळ महिलेने केला प्रतिकार

SCROLL FOR NEXT