आरोग्यभान ः वैयक्तीक - सार्वजनिक.... लोगो
(१४ नोव्हेंबर पान २)
हल्ली किडनी फेल होऊन डायलिसिसला जाणारे रुग्ण वाढत आहेत. किडनी डोनरच्या अभावी बरीच वर्षे डायलिसिसचे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय दवाखान्याच्या चकरा मारत दिवस काढत असतात. हे थांबायचे असेल तर ही गंभीर समस्या समजून घ्यायला हवी.
- rat२०p५.jpg-
25O05564
- डॉ. सुनील कोतकुंडे
----
मूत्रपिंडाचे आजारांचा
वाढता विळखा
मूत्रपिंड किंवा किडनी हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो शरीरातील आणि पर्यायाने रक्तातील विष बाहेर टाकण्याचे काम सातत्याने करत असते. बदलत्या जीवनशैलीचा, खाद्यसंस्कृतीचा किडनीवर गंभीर परिणाम दिसत आहे. एकविसाव्या शतकात दीर्घ मूत्रपिंड विकार (सीकेडी) हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या दीर्घकालीन आजारांमधील पहिल्या दहातील एक आहे. या आजाराची लक्षणे खूप उशिरा दिसतात, त्यामुळे सुरुवातीला आजार कुणाच्याच लक्षात येत नाही. जेव्हा लक्षात येते तेव्हा आजाराने बरेच नुकसान करून ठेवलेले असते; परंतु वेळेवर निदान झाल्यास आजाराची गती बऱ्यापैकी कमी करता येते आणि डायलिसिस किंवा ट्रान्सप्लान्ट टाळता येऊ शकते, म्हणूनच हा लेखप्रपंच.
* समस्येचे गांभीर्य
- सर्वसाधारणपणे सुमारे सातात एक म्हणजे १५ टक्के लोकांमध्ये हल्ली मूत्रपिंड विकार आहे.
- भारतात सुमारे १० टक्के लोकांमध्ये हा आजार आढळतो.
* आजाराचा परिणाम -मूत्रपिंड निकामी झाल्याने शरीर कमकुवत होते, रक्तक्षय म्हणजे अॅनेमिया, हाडे कमकुवत होतात. प्रतिकारशक्ती कमी होऊन रुग्ण सारखा आजारी पडू लागतो, अशक्तपणा वाढतो व जीवनमान खालावत जाते. तीव्र मूत्रपिंड विकार हे आजकाल होणाऱ्या मृत्यूच्या पहिल्या दहातील एक कारण आहे. मध्यम स्वरूपाचा विकार असलेल्या रुग्णांना इतरांपेक्षा हृदयविकाराचा धोका ३ ते १० पट जास्त असतो. शेवटच्या पायरीवर म्हणजे डायलिसिस रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढत जाते.
* मूत्रपिंड विकाराची मुख्य कारणे
- मधुमेह अंदाजे ४० टक्के
- उच्च रक्तदाब अंदाजे ३० टक्के
- निकृष्ट आहार ः अतिप्रक्रिया केलेले व पॅकेटबंद खाद्यपदार्थ किडनीला धोकादायक असतात. अतिरिक्त साखर, मीठ व चरबीयुक्त पदार्थामुळे रक्तातील प्रमाण घटवण्यासाठी किडनीवर भार वाढतो. अशा पदार्थांमुळे रक्तदाबही वाढतो, ज्याचा परत किडनीवर दुहेरी मारा होतो. आपल्या आहारात भाज्या आणि फळांचा पुरेसा वापर नसल्याने किडनीला निरोगी ठेवणारी अतिऑक्सिडन्ट कमी पडतात. बैठी जीवनशैलीमुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठू लागते. पाठोपाठ येणारा लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाबामुळे किडनीवर भार वाढतो. लघवीच्या वाटेला किंवा मूत्रपिंडाला वारंवार होणारा जंतूसंसर्ग यामुळे किडनीचे नुकसान होते.
फॅड किंवा डिटॉक्स डाएट ः नको त्या भ्रामक कल्पना धारण करून भाज्या व फळाच्या ड्रिंक्स किंवा शॉट्स घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मूतखड्यांचं प्रमाण वाढते आहे ज्याच्यामुळे मूत्राला अवरोध होतो. वेदनाशामक गोळ्यांचा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनिर्बंध वापर हे किडनीच्या नुकसानाचे महत्वाचे कारण आहे. बदलते ऋतुमान व वाढता उकाडा तसेच बाहेर काम करणारे कामगार पुरेसे पाणी न प्यायल्यामुळे किडनीचे नुकसान होते. वाढते प्रदूषण व परिणामी रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीवर भार वाढत आहे.
*लक्षणे ः सुरुवातीची किंवा प्राथमिक लक्षणे
थकवा, पाय किंवा घोटे सुजणे, रात्री वारंवार लघवी होणे, फेसाळ लघवी (प्रोटिनयुरिया), उच्च रक्तदाब.
उशिरा दिसणारी किंवा गंभीर लक्षणे ः शरीराला तीव्र सूज, दम लागणे, भूक मंदावणे किंवा मळमळ, अंगाला खाज, स्नायूंमध्ये गोळे, लघवी कमी होणे.
*मूत्रपिंड विकार कसा टाळता येईल
मधुमेह नियंत्रणात ठेवणे, साखरेत चढ-उतार टाळणे, औषधे नियमित घेणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे, नियमित औषधे घेणे. वेदनाशामक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. किडनीला ही घातक ठरू शकतात हे जाणावे. मूत्रपिंडाला धोकादायक औषधे जशी इबुप्रोफेन, डायक्लोफेनाक, केटोरोलेक इ. दीर्घकाळ वापरू नयेत. पुरेसे पाणी पिणे. दिवसाला १०-१२ ग्लास पाणी शरीराला आवश्यक असते हे जाणावे. निरोगी जीवनशैलीसाठी तेल, मिठाचे व साखरेचे प्रमाण कमी करणे. आहारात फळे, संपूर्ण धान्ये यांचे प्रमाण वाढवणे व अतिप्रक्रिया केलेले, पाकिटबंद, तळलेले खाणे टाळावे. नियमित व्यायाम करावा, व्यसने टाळावे व वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करावा. हृदयाचे आरोग्य सांभाळावे. कारण, किडनी आणि हृदयाच्या आजाराचा परस्पर संबंधित असतो.
*निदान ः मूत्रपिंड विकाराचे निदान दोन गोष्टींवर आधारित असते. किडनी फिल्टरिंग क्षमता, सिरम क्रिएटिनिन तपासणी, एल्ब्युमिन-क्रिएटिन रेश्यो व लघवीत प्रोटिनची मात्रा.
मुख्य मुद्दे ः मूत्रपिंड विकार सामान्यतः मुक्याने वाढणारा धोकादायक आजार आहे. रक्तदाब, साखर नियंत्रण आणि जीवनशैली सुधारली तर मूत्रपिंड विकाराची गती कमी करता येते. मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, हृदयविकार किंवा कुटुंबातील कोणाला असा आजार असल्यास व्यक्तींनी नियमित स्क्रिनिंग करणे आवश्यक.
* किडनीसंदर्भात गैरसमज ः अॅलोपॅथिक औषधामुळे किडनी बाद होते. हर्बल औषधे किडनीसाठी सुरक्षित असतात. शरीराला सूज नाही म्हणजे किडनी स्वास्थ आहे. फक्त ज्येष्ठांना किडनी आजार होतो. किडनी दुखत नाही म्हणजे सगळं ठीक आहे. प्रोटिन खाल्ल्याने किडनी खराब होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.