swt201.jpg
05608
सावंतवाडीः शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचे उद्घाटन करताना सविता परब. बाजूला म. ल. देसाई, लक्ष्मीदास ठाकूर, सांप्रवी कशाळीकर, सृष्टी पाटील, लक्ष्मण वळवी, महेश पालव, श्रीम. वेंगुर्लेकर, बाबाजी झेंडे.
शिष्यवृत्ती परीक्षेमुळे करिअरला दिशा
सविता परबः सावंतवाडीत प्राथमिक शिक्षक संघातर्फे मार्गदर्शन वर्ग
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २०ः शिष्यवृत्ती परीक्षा केवळ विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता तपासत नाही, तर त्यांच्या भविष्याच्या वाटचालीस नवी दिशा देते. त्यामुळे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी शाखेने विद्यार्थ्यांच्या हितासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन सावंतवाडी पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी सविता परब यांनी केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने तालुक्यातील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर म. ल. देसाई, लक्ष्मीदास ठाकूर, मुख्याध्यापिका सांप्रवी कशाळीकर, सृष्टी पाटील, लक्ष्मण वळवी, महेश पालव, बाबाजी झेंडे उपस्थित होते.
श्री. ठाकूर यांनी, शिक्षकांनी या प्रशिक्षणाचा उपयोग करून आपल्या केंद्रातील आणि शाळेतील गुणवत्ता १०० टक्के वाढवावी, असे आवाहन केले. श्री. देसाई यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची सामाजिक बांधिलकीची भूमिका स्पष्ट केली. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या हितासाठी असे उपक्रम सातत्याने राबवले जातील, अशी ग्वाही दिली.
या मार्गदर्शन वर्गात तज्ज्ञ मार्गदर्शकांनी नवीन अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका स्वरूप, शिष्यवृत्ती परीक्षेच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन व जलद गतीचे तंत्र, गणिते व प्रश्न जलदगतीने सोडवण्याचे सोपे तंत्र शिकवण्यात आले. विद्यार्थ्यांमधील परीक्षेची भीती काढून आत्मविश्वास वाढवण्याचे आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचे उपाय, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून महत्त्वाचे घटक कोणते आहेत, याचीही माहिती देण्यात आली.
या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाला तज्ज्ञ मार्गदर्शक निलांगी गावडे, महेश पालव, अनिल तालेवार, पंडित मैंद, तेजस बांदिवडेकर, शुभेच्छा सावंत, रोशनी राऊत, महेश सावंत, श्वेता राऊळ यांनी मार्गदर्शन केले. या शिष्यवृत्ती वर्गाचे नियोजन जिल्हा उपाध्यक्ष सुरेंद्र विर्नोडकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष विजय गावडे, सचिव रुपेश परब तसेच तालुका कार्यकारिणीने यांनी केले. सूत्रसंचालन शुभेच्छा सावंत यांनी केले. दीपक राऊळ यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.