कोकण

गुहागर नगरपंचायतीत माघारीकडे लक्ष

CD

गुहागर नगरपंचायतीत माघारीकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २० : गुहागर नगपंचायतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षपदाचे चित्र शुक्रवारी (ता. २१) स्पष्ट होणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात याकडे लक्ष असून, त्यानंतरच लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.
गुहागर नगपंचायतीच्या नगरसेवकपदासाठी १७ जागेसाठी ५२ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. नगराध्यक्षपदासाठी एका जागेसाठी पाच अर्ज आहेत. यापैकी किती अर्ज मागे घेतले जातात, हे आता बघण्यासारखे आहे. महाविकास आघाडीने १७ ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, नगराध्यक्षपदाचाही अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करून महायुतीतून फारकत घेतली आहे. त्यांनी नगरसेवकपदासाठी सहा उमेदवारी अर्ज तसेच नगराध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. भाजपने नगरसेवकपदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून, नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून १७ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, नगराध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. नगराध्यक्षपदासाठी एक अपक्ष उमेदवार अर्ज दाखल आहे. महायुती होणार की, नाही हे शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: ''पटेल, तटकरे, अरोरा..'', रोहित पवारांनी तिघांची नावं घेत केले गंभीर आरोप

Ulka Mahajan : पारितोषिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य चळवळीसाठी ऊर्जा ;उल्का महाजन यांची भावना, ‘आंतरभारती’कडून कुसुम पुरस्काराने सन्मान

Latest Marathi News Live Update : जिंतूरजवळ अकोली पुलावर भीषण अपघात; गंगाखेडचे चार तरुण जागीच ठार

8th Pay Commission : 31 डिसेंबर 2025 पूर्वी निवृत्त झालेल्यांना सुधारित पेन्शन मिळणार का? सरकारचं संसदेत स्पष्ट उत्तर

Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

SCROLL FOR NEXT