कोकण

रत्नागिरी ः कौटुंबिक नाती तुटण्या-जुळण्याची प्रभावी मांडणी : तिनसान

CD

rat21p6.jpg-
05848
रत्नागिरीः राज्य नाट्यस्पर्धेत प्रायोगिक थिएटर्स असोसिएशन या संस्थेने केलेल्या तिनसान या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
--

कौटुंबिक नात्यांची शोकांतिका सांगणारे तिनसान
प्रायोगिक थिएटर्स कुर्णे संस्थेचा प्रयोग; वृद्धांच्या व्यथांची यशस्वी मांडणी
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २१ ः आई-वडील, मुलांचे संगोपन उत्तम शिक्षण देऊन मोठं करतात आणि मुलं मोठी झाली की, त्यांना पंख फुटल्यासारखे घरट्यातून निघून जातात. वृद्ध आई-वडिलांना सोडून मुलगा परदेशात जातो. हा प्रवास ‘तिनसान’ या नाटकातून मांडण्यात आला आहे. राज्य नाट्यस्पर्धेत प्रायोगिक थिएटर्स कुर्णे (ता. लांजा) या संस्थेने येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात हा प्रयोग केला. कलाकाराच्या अभिनयातून वृद्ध आई-वडिलांच्या व्यथा मांडण्यात संस्था यशस्वी झाली.
----------

काय आहे नाटक ?

मंत्रालयातील निवृत्त अधिकारी त्यांची पत्नी आणि मुलगा-संजय यांच्या जीवनप्रवासावर रंगणारी कथा तिनसान या नाटकातून लेखकाने मांडली आहे. निवृत्त अधिकारी आपल्या मुलाला घेऊन मुंबईत फिरताना अचानक बॉम्बस्फोट होतो. त्या वेळी त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर असतो; पण तिथे जवळच असलेल्या एका लहान मुलाला वाचवताना त्यांचा स्वतःचा मुलगा बॉम्बस्फोटात मृत पावतो. वाचवलेला तो मुलगा अनाथ असतो. त्याला ते घरी घेऊन येतात आणि स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात. त्याचे नाव संजय असे आहे. तो मोठा होतो. ते अधिकारी निवृत्त झाल्यानंतर पत्नी व मुलगा संजय यासह गावी येतात. तोपर्यंत संजयला चांगली नोकरी लागलेली असते. त्याचा विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न सुरू असतात. त्यासाठी संजयचा मित्र जॉनही मदत करत असतो. हे करत असतानाच संजय विवाह जुळवणाऱ्या संस्थेतील शोभा नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. कालांतराने तो तिच्याशी लग्नही करतो. त्याचा संसार सुखाचा सुरू असतो. काळ जात असतानाच संजयला नोकरीत बढती मिळते. त्याचवेळी त्याचा विदेशी जाण्याचा मार्गही मोकळा झालेला असतो. संसाराचा गाढा हाकतानाच कौटुंबिक कलह डोकावू लागतात. संजयची पत्नी शोभा त्याच्या आई-वडिलांना त्रास देण्यास सुरवात करते. एके दिवशी संजय मद्यपान करून घरात येतो आणि जिवलग मित्र जॉनला घरातून बाहेर काढतो. हे सर्व बदल संजयच्या वडिलांचे मित्र गोपू हे पाहत असतात. गोपूकाका यांना संजयची सर्व माहिती असते.
एके दिवशी शोभा आणि संजय परदेशात निघून जातात. इकडे संजयच्या वडिलांना पॅरॅलिसिस होतो. त्यांचं बोलणं, खाणं बंद होते. सुखी संसाराची झालेली वाताहात आणि आजारपण याने निवृत्त अधिकाऱ्यांची तब्येत आणखीनच खालावते. एकदा खुर्चीत बसलेले असतानाच त्यांचा मृत्यू होतो. ते सर्व पाहिल्यानंतर तिथेच आईही मृत पावते. ही सर्व गोष्ट गोपूकाका संजयला फोनवर करून सांगण्याचा प्रयत्न करत असतात; पण संजय त्यांचे ऐकून घेत नाही. अखेर ते ई-मेलवरून सर्व माहिती पाठवतात. ते वाचल्यानंतर संजयला आपण अनाथ असल्याची माहिती समजते आणि मोठा धक्का बसतो. आई-वडिलांमुळे आपल्याला सुखी जीवन मिळाल्याचे समजल्यानंतर तो आणखीनच खजील होतो. तो तातडीने परदेशातून घरी येतो; पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. घरामध्ये आई-वडिलांचा मृत्यू झालेला असतो. हृदयाला भिडणारी कथा, उत्तम अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना यांची मिळालेली जोड यामुळे नाटक प्रक्षकांच्या पसंतीस उतरले.
-------
सूत्रधार आणि सहाय्य

प्रकाशयोजना ः सागर सकपाळ, पार्श्वसंगीत ः श्रुती पवार, रंगभूषा ः नरेश पांचाळ, वेशभूषा ः आकांक्षा खामकर, नेपथ्य ः सुधाकर पांचाळ, रंगमंच व्यवस्था ः शिवाजी वाडेकर, सम्यक हातकर, अमर आयरे, राज बोरकर, आदित्य दत्ते, श्रेयश सकपाळ.

-----

पात्र परिचय
बालकलाकर ः परी झगडे, अमर खामकर. आई- मयुरा डोमणे, बाबा ः रवींद्र कांबळे, संजय ः संदीप कांबळे, शोभा ः मुक्ता शिर्के, गोपू ः वेदांत झगडे, जॉन ः सुमेध कांबळे, महिला-१ ः आराध्या खामकर, मुलगा-१ ः ओमकार पेंडकळकर, मुलगा-२ ः चिन्मय जोशी, मुलगा-३ ः शैलेश इंगळे, मुलगा-४ ः विनय कांबळे.
----------
शनिवार-रविवारी नाटक नाही.
सोमवारी (ता. २४) नाटक ः सुखाशी भांडतो आम्ही, सादरकर्ते ः श्री देव गणपती ऑफ धामापूर अॅण्ड मारूती ऑफ माखजन. स्थळ ः स्वातंत्र्यवीर सावरकर नाटयगृह, मारूती मंदिर- रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT