कोकण

मंडणगड आगाराचे चाक ‘शीतयुद्धात’ अडकले

CD

ग्राऊंड रिपोर्ट
rat21p9.jpg-
05815
मंडणगड : एसटी वेळेवर येत नसल्याने प्रवाशांना बसस्थानकात ताटकळत राहावे लागते.
rat21p10.jpg-
05819
अवेळी सुटणाऱ्या प्रवासीफेऱ्यांमुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे.
---------

मंडणगड आगाराचे चाक
‘शीतयुद्धात’ अडकले
चालक-वाहक व व्यवस्थापनातील वाद; प्रवाशांची गैरसोय, आगाराच्या उत्पन्नावर परिणाम

इंट्रो

मंडणगड तालुक्यातील एसटी प्रवाशांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चालक-वाहक आणि आगार व्यवस्थापन यांच्यात गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे कामकाज विस्कळीत झाले आहे. कर्मचारीवर्गाने आगार व्यवस्थापकांच्या कार्यपद्धतीविरोधात असहकाराची भूमिका घेत डबलड्युटी व ओव्हरटाईम करण्यास नकार दिला आहे तर आगार व्यवस्थापन नियमांच्या चौकटीत प्रमाणीय काम करत आहे; मात्र याचा थेट परिणाम हा प्रवासी वाहतुकीवर होत आहे. परिणामतः सामान्य प्रवाशांची गैरसोय होत आहे तसेच आगारालादेखील आर्थिक फटका बसत आहे. त्याचा ‘सकाळ’ने घेतलेला वेध..
- सचिन माळी, मंडणगड
---------
चौकट

१२ दिवसांपासून शीतयुद्ध कायम

मंडणगड आगारात चालक-वाहक आणि व्यवस्थापन यांच्यातील मतभेद शिगेला पोहोचले असून, त्याचा थेट परिणाम कामकाजावर झाला आहे. कर्मचारीवर्गाचा आरोप आहे की, आगार व्यवस्थापक मदनीपाशा जुवेदी यांच्या दडपशाही शैलीमुळे कामाचा ताण वाढला आहे. कर्मचारी न थकता काम करत असतानाही त्यांना योग्य वागणूक, रजा, वेळेवर ओव्हरटाईम आणि आवश्यक विश्रांती मिळत नसल्याचे कर्मचारीवर्गाचे म्हणणे आहे. व्यवस्थापन मात्र सर्व कार्य कृती नियमांच्या चौकटीत करण्याचा दावा करत आहे. दोन्ही बाजू आपापल्या भूमिकेत ठाम असल्याने परिस्थिती अकरा दिवसानंतरही जैसे थे आहे.

चौकट
डबलड्युटी, ओव्हरटाईम नाकारण्याची कारणे

कर्मचारीवर्गाने मांडलेल्या तक्रारींमध्ये रजा वेळेवर न देणे, अपमानास्पद वर्तन व अधिकारांचा गैरवापर, नोटिसा, दंडात्मक कारवाई व प्रशासकीय दबाव या सर्वांमुळे त्रस्त झालेल्या चालक-वाहकांनी असहकार आंदोलनाचा मार्ग स्वीकारत डबलड्युटी, ओव्हरटाईम करण्यास नकार देत आहेत.

चौकट
महत्त्वाच्या गाड्या रद्द
गेल्या १२ दिवसांत अनेक महत्त्वाच्या फेऱ्या रद्द झाल्याने विद्यार्थी, नोकरदार, रुग्ण, महिला आणि ग्रामीण भागातील लोक अडचणीत आले आहेत. मंडणगड-मिरज व मंडणगड-बीड लांब पल्ल्याच्या गाड्या बंद, मंडणगड-शिर्डी, नालासोपारा, मुंबई या भारमानाच्या गाड्या दापोली आगाराकडे वर्ग केल्या आहेत. ग्रामीण भागात धावणाऱ्या गाड्या उशिराने धावत असून, पर्यायी वाहतूक म्हणून महागड्या खासगी वाहतुकीचा पर्याय आहे.

----------
चौकट
तालुक्याच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम
वाहतूक बंद, विस्कळीत झाल्यामुळे रोजगार, शिक्षण आणि व्यवसायावर परिणाम, रुग्णांना उपचारासाठी जाण्या-येण्यात अडथळे, दूरच्या तालुक्यांतून येणाऱ्या शिक्षकांची गैरसोय, मंडणगड-मिरज गाडी बंद असल्याने उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. नगर- बीड भागातील शिक्षकांसाठी प्रवासी गैरसोय होत आहे.
---------
चौकट
आगाराचे आर्थिक नुकसान
या सर्व परिस्थितीमुळे आधीच तोट्यात असणाऱ्या आगाराला वाढीव फटका बसत आहे. वेळापत्रक कोलमडल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी खासगी वाहतुकीकडे वळण्यास सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात भारमान कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

चौकट

कर्मचाऱ्यांची नाराजी

प्रवाशांच्या सोयीसाठी व गोंधळ टाळण्यासाठी काही मार्गांवरील गाड्या दापोली, खेड आगाराकडून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला; मात्र यामुळे स्थानिक कर्मचारी अधिक संतप्त झाले असून, त्याची आर्थिक झळ मंडणगड आगारालाच बसत आहे.

अधिकाऱ्यांची भेटही निष्फळ

विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगाराला भेट देऊन चर्चा केली; परंतु कोणताही तोडगा निघालेला नाही. मंडणगड तालुका प्रगतीपथावर असताना वाहतूक व्यवस्थेतील हा पेच संपूर्ण तालुक्याच्या दळणवळण विकासाला मोठा अडथळा निर्माण करत आहे.

कोट
मंडणगड स्थानकातून नियमित फेऱ्या या नियोजित वेळेत सुटत नाहीत. दोन महिन्यांपासून कोणतीही फेरी दोन तासांच्या आधी पूर्ण होत नाही. याबाबत वारंवार निवेदन, तक्रार करूनही यामध्ये सुधारणा होत नाही. अन्य आगाराकडे गाड्या वळवल्याने स्थानिक प्रवाशांना गैरसोय होत आहे.
- विजय खैरे, प्रवासी हितचिंतक

कोट
आगारातील वादात नाहक प्रवाशांचा खोळंबा आणि त्रास सहन करावा लागतो आहे. एसटी प्रवासावर अवलंबून असणारे वयोवृद्ध नागरिक, विद्यार्थी यांचे नुकसान होत आहे. प्रवाशांना सुयोग्य सेवा देण्याऐवजी विलंबाने फेऱ्या, अस्वच्छ स्वच्छतागृह अशी सेवा देण्यात येत आहे.
- अरविंद येलवे, अध्यक्ष, संघर्ष समिती मंडणगड

कोट
मंडणगड आगारांमध्ये सध्या १४१ चालक-वाहक कार्यरत आहेत. आवश्यक चालक-वाहकांची संख्या १७३ आहे. जवळपास ३२ चालक वाहक कमतरता आहे. त्यामुळे दररोज डबलड्युटी चालक-वाहकांचा वापर करून वाहतूक संचलन केले जाते; परंतु १० नोव्हेंबरपासून चालक -वाहकांनी डबलड्युटी कर्तव्य करण्यास नकार दिला आहे. ग्रामीणच्या सर्व फेऱ्या सध्या सुरू आहेत. मध्यम व लांब पल्ल्याच्या नऊ फेऱ्या रद्द करून वाहतूक संचलन सध्या सुरू आहे. गैरहजर चालक-वाहक, वाहनांचे झालेले नुकसान, उत्पन्न कमी झाल्याने विचारणा पत्र, डिझेल जास्त लागल्याने याकरिता देण्यात आलेले विचारणा पत्र या सर्व कारणांकरिता चालक-वाहक डबलड्युटी करण्यास नकार देत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, झालेल्या कारवाया चुकीच्या अनावश्यक आहेत. हा त्यांचा गैरसमज असून, त्यांनी तो दूर करावा.
- मदनीपाशा जुवेदी, आगार व्यवस्थापक.

कोट
आम्ही मंडणगड आगाराला भेट देऊन सूचना केल्या आहेत तसेच ही परिस्थिती संपुष्टात यावी यासाठी प्रयत्न करत आहोत. लवकरच वरिष्ठ अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल.
- रवींद्र लवेकर, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT