कोकण

संगमेश्वरात दरवळतोय पोपटीचा सुगंध

CD

-rat२१p१७.jpg-
P२५O०५८४१
संगमेश्वर ः पोपटीचा आनंद घेताना नागरिक.
----
संगमेश्वरात दरवळतोय पोपटीचा सुगंध
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २२ः कोकणातली थंडी म्हणजे फक्त गारवा नाही तर जिभेवर नाचणाऱ्या चवींचाही हंगाम. सध्या सर्वत्र गुलाबी थंडीची चाहूल लागलेली आहे. त्यामुळे संगमेश्वरमध्ये पोपटीचा सुगंध सर्वत्र दरवळू लागलेला आहे. कोकणच्या मातीमधील हा पारंपरिक प्रकार असून, त्याची चव जगातील कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही.
थंडीच्या दिवसांत वाल, पावटे यांचे भरघोस उत्पादन मिळू लागते. बाजारात त्यांचा सुगंध दरवळू लागतो आणि मग गावातील अंगणातून बोचऱ्या थंडीत पोपटीचा बेत आखला जातो. घरातली मडकी बाहेर काढली जातात, केळीची हिरवीगार पानं धुऊन मडक्याच्या आत लावली जातात. तळाशी भांबुर्डी किंवा भामरूटाचा पाला पसरवून जणू निसर्गाचंच अंथरूण तयार केले जाते. त्यावर एकेक थर घालत ही कोकणी जादू सुरू होते. वालाच्या शेंगा, पावटे, बटाटे, भाज्या, ओव्यासारखा अंगावर येणारा मसाला, हळदीचा सुवास आणि मांसाहार करणाऱ्यांसाठी मासे किंवा चिकनचे तुकडे. हे सगळं थरावर थर रचून मडक्याचं तोंड पुन्हा भांबुर्डीच्या पाल्याने घट्ट बंद केले जाते. अंगणात खड्डा खणून विस्तव पेटवून हे मडकं शेकोटीत ठेवलं जातं. दीड तासात त्या मडक्यातून उठणारा खमंग सुगंध पसरतो, त्यालाच पोपटी म्हणतात.

Nashik Election :व्यक्ती की पक्ष? मागील अपयशानंतर पंचवटी 5 मध्ये भाजपची हवा; इच्छुकांमुळे बंडखोरीची शक्यता

तेव्हा स्थळं यायची आणि अजूनही येतात पण... लग्नाविषयी विचारणाऱ्यांचे मुक्ता बर्वेने टोचले कान; 'माझं आयुष्य हे...'

Latest Marathi News Live Update : भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक

Nashik Fire Accident : दुःखाचा डोंगर! मुलीच्या लग्नासाठी जपलेली तीन लाखांची रक्कम आगीत खाक, आईचे स्वप्न भंगले

Tejas crash : दुबई एअर शो मध्ये क्रॅश तेजस विमानाच्या पायलटचा शेवटचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT