-rat२१p१९.jpg-
२५O०५८६१
दापोली ः साखळोली–शिवाजीनगरला जोडणाऱ्या पुलावरील लोखंडी शिगा बाहेर पडल्या आहेत.
---
साखलोळी–शिवाजीनगर पुलाची दयनीय अवस्था
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप; तत्काळ दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ : कोकणातील पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यातील विकासाच्या दाव्यांना साखळोली–शिवाजीनगर रस्ता आणि येथील जीर्ण पुलाने साफ खोडा काढला आहे. रस्त्यातील खड्डे, उघड्यावर आलेल्या लोखंडी शिगा आणि तुटक्या पुलाची अवस्था पाहता ‘रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ता?’ असा संतापजनक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
साखळोली–शिवाजीनगरला जोडणारा पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. पुलाचे कठडे ठिकठिकाणी तुटले असून, पाया कमकुवत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात पुलावरून जोरात पाणी वाहते तर उर्वरित काळात शालेय मुले, वृद्ध, महिला यांना जीव मुठीत धरून पुलाचा वापर करावा लागतो. एखादा अनर्थ ओढवल्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत. रस्त्यावरील डांबरीकरण पूर्णपणे उखडले असून, उघड्यावर आलेल्या लोखंडी शिगांमुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. मोठे खड्डे आणि असमतोल रस्ता यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांना दवाखान्यात नेणे ही रोजची परीक्षा बनली आहे. खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालकही या मार्गावर जाण्यास नकार देत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. साखळोली आणि शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.