दापोली किनाऱ्यावर कडक बंदोबस्त
दापोली : भारतीय तटरक्षक दलातर्फे आयोजित ''सागरी कवच अभियान - २०२५'' च्या पार्श्वभूमीवर दापोली पोलिस दल पूर्णपणे सज्ज झाले असून, संपूर्ण किनारपट्टीवर कडक पहारा ठेवण्यात आला आहे. तालुक्यातील महत्त्वाच्या सागरी जेटी, सर्व लँडिंग पॉईंटस्, विविध चेकपोस्टवर संभाव्य धोके ओळखून आणि सागरी सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे ''अलर्ट मोड''वर आहे. नागरिकांनी काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वक्तृत्व स्पर्धेत ६५ विद्यार्थ्यांचा सहभाग
दापोली : दापोली येथील ब्रिलियंट करिअर अॅकॅडमी आणि रोटरी क्लब ऑफ दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झाली. मराठा मंदिर सीबीएसर्इ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धेत पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण चार गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधून तब्बल ६५ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
दिव्यांग क्षेत्रातील संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन
रत्नागिरी : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ नुसार दिव्यांग कल्याण विकास पुनर्वसन व सक्षमीकरण क्षेत्रात काम करणाऱ्या नागरी समाज संघटना / संस्थांनी दिव्यांग कल्याण आयुक्त, पुणे यांच्याकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. ज्या संस्थांची नोंदणी झाली नसेल अशा पात्र संस्थांनी आपले परिपूर्ण प्रस्ताव दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालयात ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय, जिल्हा परिषद येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले आहे.
टीईटी परीक्षेसाठी विशेष बससेवा
दापोली : आगामी टीईटी परीक्षेसाठी तालुक्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशाने दापोली आगारातर्फे विशेष एसटी बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांची वाढती संख्या आणि सकाळच्या वेळेत होणारी प्रवासाची कोंडी याचा विचार करून ही सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेंद्र उबाळे यांनी दिली. दापोली ते रत्नागिरी या मार्गावर परीक्षेला जाण्यासाठी बस सकाळी ७ वाजता दापोली आगारातून सुटणार असून, परतीसाठी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथून खास बस सोडण्यात येणार आहे. परीक्षेच्या दिवशी वेळेत पोहोचण्याचा प्रश्न कायम भेडसावत असल्याने ही सेवा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही बससेवा फक्त परीक्षेपुरती असून, सर्व पात्र परीक्षार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.