कोकण

गटार व्यवस्थेचा अभाव; विक्रेत्यांचे रस्त्यावरच ठाण

CD

लोगो प्रभागाचे अंतरंग - भाग ७
--
05897
कणकवली : शहर नळयोजनेचे पाईप वारंवार लिकेज होत असल्‍याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो.

05898
कणकवली : बाजारपेठेच्या मागील रस्त्यावरील गटारे बंदिस्त झाल्‍याने वाहनचालक, पादचाऱ्यांचा धोका कमी झाला आहे.

05899
कणकवली : बाजारपेठेच्या मागील बाजूच्या रस्त्यावरही सातत्‍याने वाहतूक कोंडी होते.

05900
कणकवली : बाजारपेठेत भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव कायम असून अनेकदा ग्राहकांच्या पिशव्यांमधील साहित्‍य पळवून नेतात.


गटार व्यवस्थेचा अभाव; विक्रेत्यांचे रस्त्यावरच ठाण

कणकवली बाजारपेठेतील समस्या; वाहतूक कोंडीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिक हैराण

राजेश सरकारे ः सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २१ ः येथील बाजारपेठेच्या उत्तर भागाचा समावेश असलेल्या प्रभाग सातमध्ये केला आहे. शहर बाजारपेठेतील महत्‍वाची बाब म्‍हणजे बाजारपेठेत गटार व्यवस्थाच अस्तित्वात नसल्‍याची परिस्थिती आहे. याखेरीज बाजारपेठेत विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून व्यवसाय करतात. हॉकर्स देखील बाजारपेठेत व्यवसाय करतात. यावर नियंत्रण आणणे नगरपंचायत प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना शक्‍य झालेले नाही.

शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते झेंडा चौक तेथून भवानी मंगल कार्यालय ते तात्या हर्णे घर आणि तेथून भालचंद्र आश्रम, टकले हॉटेल मार्गे सारस्वत बँक, राष्ट्रीय महामार्ग ते पटवर्धन चौक अशी उत्तर बाजारपेठ प्रभाग सातमध्ये समाविष्ट आहे. शहरातील सर्वाधिक ११२३ मतदार देखील याच प्रभागात आहेत. या प्रभागात पूर्णतः व्यापारी बांधवांची दुकाने आणि घरे दाटीवाटीने आहेत. हा भाग सदैव गजबजलेला असतो. शहराची मुख्य बाजारपेठ या प्रभागात आहे. मात्र, व्यापारी आणि विक्रेत्‍यांचे अतिक्रमण, कुठेही उभी केली जाणारी वाहने, वर्षभर कुणाचे ना कुणाचे बांधकाम असल्‍याने रस्त्यावर ओतलेली वाळू, खडी, त्यात मोकाट फिरणारी जनावरे, भटकी कुत्री यांचा उपद्रव, सतत होणारी वाहतूक कोंडी, वाहनांच्या भोंग्याचे कर्णकर्शक आवाज याचाही त्रास इथल्या व्यापारी बांधवांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील मालवण, देवगड बाजारपेठांच्या तुलनेत कणकवली बाजारपेठेतील रस्ता रूंद आहे. पंधरा वर्षापूर्वी या बाजारपेठेतून नागवे, करंजे, फोंडाघाटकडे जाणारी एस.टी. वाहतूक देखील सुरू होती. मात्र, बेशिस्त पार्किंग आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे बाजारपेठतून जाणारी एस. टी. वाहतूक बंद करण्यात आली. ही वाहतूक बाजारपेठेच्या मागील बाजूच्या रस्त्यावरून वळविण्यात आली. मात्र, भालचंद्र आश्रम संस्थानमध्ये येणारी वाहने थेट रस्त्यावरच उभी केली जातात ही वाहने बाजूला करण्यात चालक, वाहकांना खाली उतरावे लागत असे. त्‍यामुळे गेल्‍या दोन वर्षापासून भालचंद्र संस्थान ते पटकी देवी या दरम्‍यानच्या रस्त्यावरून होणारी एस. टी. वाहतूक देखील बंद करण्यात आली असून सध्या रवळनाथ मंदिर ते चौंडेश्‍वरी मंदिर या रस्त्यावरून ही वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहून जाऊ नये यासाठी पटकीदेवी मंदिर ते कांबळी गल्लीपर्यंत बंदिस्त गटार बांधण्यात आले होते. गेल्‍या दहा वर्षात या गटाराची दोन वेळा दुरूस्तीही झाली. मात्र, गटावरील सिमेंट क्राँक्रिट गटारामध्ये कोसळून ही गटारे बंद झाली आहेत. झेंडा चौक ते पटवर्धन चौकपर्यंत गटारे बांधण्यात आली होती. मात्र, ती देखील बंद स्थितीत असल्‍याने पावसाळ्यात थेट रस्त्यावरूनच पाण्याचा निचरा होतो. सतत रस्त्यावरच पाणी साचून राहत असल्‍याने बाजारपेठेचा रस्ता दरवर्षी खड्डेमय होत आहे.
बाजारपेठेच्या मागील बाजूस अंधारी गिरण ते सारस्वत बँकपर्यंत गटार बांधले. मात्र, त्यातून सांडपाण्याचा निचरा होत नाही. टकले हॉटेल ते झेंडा चौक या भागातील गटार व्यवस्था सुस्थितीत आहे. तसेच ही गटारे बंदिस्त करण्यात आल्‍याने पादचारी, वाहन चालकांना भेडसावणारा धोका टळला आहे. शहरातील तेलीआळी, डीपी रोड, धडाम दुकान ते संत जगनाडे चौक हे भाग नो हॉकर्स झोन म्हणून जाहीर झाले आहेत. मात्र, या हॉकर्स झोनमध्ये फेरीवाले कधी फिरकलेच नाहीत. राष्‍ट्रीय महामार्ग आणि बाजारपेठ यामध्येच या फेरीवाल्‍यांची दुकाने, हातगाड्या फिरत असतात.
बाजारपेठेच्या उत्तर भागातही सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाणवा आहे. येथे नगरपंचायतीची जागा उपलब्ध नसली तरी खासगी तत्वावर शौचालय बांधल्यास, बाजाररहाटासाठी येणाऱ्या नागरिकांना सोय होणार आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ आणि बाजारपेठेच्या मागील बाजूने जाणारा रस्ता हे दोन रस्ते जोडणाऱ्या अनेक गल्ल्या आहेत. या गल्ल्यांची गेल्‍या दोन वर्षात नगरपंचायतीने डागडुजी केली. त्‍याबाबत व्यापारी, ग्राहकांतून समाधानही आहे.
-----------
उड्डाणपुलाचा व्यापाऱ्यांना फटका
चार वर्षापूर्वी शहरातून उड्डाणपूल झाला. त्‍यामुळे महामार्गावरील वाहतूक या पुलावरून होत आहे. उड्डाणपुलामुळे पर्यटक शहरात न येता थेट शहराबाहेरूनच आपापल्‍या मुक्‍कामी जात आहेत. त्‍याचाही फटका बाजारपेठेला बसला आहे. चतुर्थी, दिवाळी सण वगळता बाजारपेठेत मंदीचे वातावरण असल्‍याचे व्यापाऱ्यांना वाटते.
-------------
नळयोजना जीर्ण
शहरातील बाजारपेठेतील रहिवाशांना कणकवली नळयोजनेच्या पाण्याचाही मोठा आधार आहे. मात्र, शहराची नळयोजनेला तीस वर्षे झाली आहेत. यात सातत्‍याने नळयोजनेचे पाईप फुटतात. त्‍याची दुरूस्ती होईपर्यंत एक दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहतो. त्‍यामुळे कणकवलीची नळयोजना सक्षम व्हावी अशीही नागरिकांची अपेक्षा आहे.
--------------------
कोट
कणकवली शहर बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्थेला शिस्त लागायला हवी. मुख्य बाजारपेठेच्या दोन्ही बाजूंना पर्यायी रस्ते तयार झाले आहेत. त्‍यामुळे बाजारपेठेत एकदिशा मार्गाची कडक अंमलबजावणी व्हायला हवी. तसे झाल्‍यास वाहतूक कोंडीचा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. त्‍याचा फायदा व्यापारी आणि ग्राहकांनाही होऊ शकतो.
- प्रथमेश परब, नागरिक
-----------------
अशी आहे प्रभाग रचना
* मतदार ११२३
* आरक्षण - ओबीसी महिला
* प्रभागातील समाविष्ट भाग : बाजारपेठ, भालचंद्र नगर, कोष्‍टी आळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Government: गृहखातं हातातून निसटलं, पण 'हे' मलाईदार विभाग नितीश कुमारांच्या 'जेडीयू'कडे

Gondia Crime : वडिलाचा मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचार पीडित मुलीने एका बाळाला दिला जन्म

Gadchiroli News : मारेदुमिल्ली जंगलातील चकमक ‘खोटी कथा’; आमच्या कार्यकर्त्यांना बनावट एनकाउंटरमध्ये मारले—माओवादी पत्रकाचा आरोप!

Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसायाचं रॅकेट उघडकीस, हॉटेलवर पोलिसांचा छापा; विदेशी महिला अटकेत

Gadchiroli News : शरणागतीनंतर नवजीवनाची पहाट; अर्जुन–सम्मी दाम्पत्याला पुत्ररत्न, पुनर्वसन योजनांचा गडचिरोलीत उज्ज्वल परिणाम!

SCROLL FOR NEXT