कोकण

मालवणातील सर्व प्रश्न सोडवू

CD

06016

मालवणातील सर्व प्रश्न सोडवू

नीतेश राणे ः शहरात प्रभागनिहाय प्रचार दौरा


सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २२ : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी (ता. २१) सायंकाळी शहराचा प्रभागनिहाय दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने हे सर्व प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली.
मंत्री राणे यांनी काल सकाळी वायरी येथे मातृत्व आधार फाउंडेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून या संस्थेच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या सामाजिक संस्थेने पालिका निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच संस्थेच्या सामाजिक समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर सायंकाळी शहरात प्रभागनिहाय दौरा करून संवाद साधला. प्रभाग एकमध्ये नगरसेवकपदाचे उमेदवार मंदार केणी यांच्या घराशेजारील प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रभाग २ मध्ये राजू आंबेरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली.
बांगीवाडा समाजमंदिर नजीक घेतलेल्या प्रभाग पाचच्या बैठकीत नागरिकांशी चर्चा करून त्यांचे प्रश्न श्री. राणे यांनी जाणून घेतले. प्रभाग सातमध्ये मशीद गल्लीत बैठक घेत येथील नागरिकांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. प्रभाग आठमध्ये भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्‍घाटन करून नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. शेवटी प्रभाग तीनमध्ये प्रदीप मुंबरकर यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. भाजपचे निवडणूक निरीक्षक प्रमोद रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, रणजित देसाई, तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, शहर मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर, महेश मांजरेकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, विजय निकम, संतोष गावकर उपस्थित होते.
........................
06017
सावंतवाडी : येथील पालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार दीपक केसरकर स्वतः मैदानात उतरले आहेत.

शिंदे शिवसेनेसाठी केसरकर मैदानात

सावंतवाडीत प्रचार; पालिका निवडणूक प्रतिष्ठेची

सावंतवाडी, ता. २२ ः येथील पालिका निवडणुकीत आमदार दीपक केसरकर यांनी मैदानात उडी घेतली आहे. युतीसाठी सुरुवातीपासूनच आग्रही असलेले आमदार केसरकर गेले काही दिवस शांत होते; मात्र शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर भाजप आणि शिंदे शिवसेना एकमेकांसोबत उभी ठाकल्याने खुद्द केसरकरांनी आता ‘ॲक्शन मोड’वर येत कार्यकर्त्यांसाठी रणशिंग फुंकले आहे.

सावंतवाडी पालिकेची निवडणूक भाजप आणि शिंदे शिवसेनेने आता प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीमध्ये युती होण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना या दोन्ही पक्षांकडून सुरुवातीपासून प्रयत्न होते. मात्र, नगराध्यक्षपदावरून युतीचे घोडे अडले होते. भाजपने नगराध्यक्षपदावर दावा केला होता, तर आमदार केसरकरही नगराध्यक्षपदावर ठाम होते. नगरसेवक उमेदवारीच्या वाटाघाटीत दहा-दहाच्या फॉर्मुल्यासाठी ते तयार होते; मात्र यावर शेवटपर्यंत एकमत न झाल्याने अखेर युती तुटली. त्यामुळे सावंतवाडी पालिकेसाठी शिंदे शिवसेना आणि भाजपने आता एकमेकांसमोर आव्हान उभे करत नगरसेवकांच्या वीस आणि नगराध्यक्षपदाच्या एका जागेवर परस्पर विरोधी उमेदवार उभे केले आहेत. युतीचा तिढा सुटत नसल्याने गेले कित्येक दिवस आमदार केसरकर हे प्रचाराच्या निमित्ताने कुठे दिसत नव्हते, मात्र दुसरीकडे भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी श्रद्धाराजे भोसले यांनी अधिकृतरित्या जाहीर करत घरोघरी स्वतंत्र प्रचारावर भर दिला होता. आता युती तुटल्यानंतर केसरकर हे नेमके मैदानात उतरणार का, याबाबत जनतेमध्ये संभ्रम होता. खुद्द केसरकर यांनी प्रकृतीमुळे प्रत्यक्ष प्रचारामध्ये भाग घेणार नसल्याचे सांगितले होते; मात्र भाजपकडून या ठिकाणी पालकमंत्री नीतेश राणे तसेच भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी स्वतः प्रचारामध्ये उडी घेतली आहे. तसेच भाजपचे तालुक्यातील पदाधिकारी प्रचारामध्ये उतरले आहेत. या पार्श्वभूमीवर केसरकर शिवसेनेच्या उमेदवारांसाठी गाठीभेटी घेऊन प्रचार करताना दिसत आहेत. एकूणच केसरकर ‘ॲक्शन मोड’वर आल्याने कार्यकर्ते आणि उमेदवारांनाही बळ आले आहे.
पालकमंत्री राणे यांनी आतापर्यंत चार ते पाच वेळा सावंतवाडीमध्ये येऊन निवडणुकीचा आढावा घेतला आहे. काही इच्छुक आणि अपक्ष उमेदवारांचीही त्यांनी मनधरणी करत त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावले. काही प्रभागांमध्येही त्यांनी कॉर्नर बैठका घेत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. ज्याप्रकारे पालकमंत्री राणे सावंतवाडीमध्ये आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी उतरले आहेत आणि भाजपकडून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न होताना दिसल्याने आता केसरकर यांनीही जातीनिशी लक्ष घातले आहे. त्यामुळे सावंतवाडी पालिकेचीही ही निवडणूक यावेळी ‘हाय व्होल्टेज’ अशी पाहायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chrome Users Warning : 'क्रोम युजर्स'साठी सरकारी एजन्सीने जारी केला गंभीर इशारा!

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

SCROLL FOR NEXT