कोकण

रत्नागिरीतील सायकलस्वारांची कातळशिल्पांना भेट

CD

rat23p10.jpg-
06159
रत्नागिरी : रत्नागिरी सायकलिस्ट क्लब, निसर्गयात्रीतर्फे कोळंबे येथे आयोजित कातळशिल्प सायकल राईडप्रसंगी हरणाचे कातळशिल्पाच्या ठिकाणी उपस्थित सदस्य.
rat23p15.jpg-
06188
रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्रात माहिती घेताना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य.

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची ‘हेरिटेज राईड’
दहा कातळशिल्पांच्या समूहाला भेट; विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : ‘हेरिटेज विक’निमित्त रत्नागिरी सायकलिस्ट क्लब आणि निसर्गयात्री संस्थेने कोळंबे येथे कातळशिल्प पाहण्यासाठी रविवारी सायकल राईडचे यशस्वी आयोजन केले. जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकित झालेली कातळशिल्पे पाहणे हा या सायकल राईडचा उद्देश होता. यामध्ये सहभागी झालेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य आणि शालेय विद्यार्थ्यांनी १० कातळ शिल्पांचा समूह पाहिला.
सायकल राईडच्या या उपक्रमासाठी आयआयटी एम प्रवर्तक टेक्नॉलॉजी फाउंडेशन आयआयटी मद्रास द्वारा संचालित कोंकणातील कातळ शिल्प आणि वारसा संशोधन केंद्राचे सहकार्य लाभले. सकाळी ६.३० वाजता जयस्तंभ येथून सायकल राईडला सुरवात झाली. ही फेरी सागरी महामार्गाने भाट्ये, फणसोपमार्गे कोळंबे येथील कातळसड्यावर पोहोचली. तेथे कातळशिल्प शोधकर्ते सुधीर रिसबुड यांच्यासह कोकणातील कातळशिल्प व वारसा संशोधन केंद्राचे ऋत्विज आपटे, तार्किक खातू, गार्गी परुळेकर व अजिंक्य प्रभुदेसाई आणि अभ्यासक श्रीवल्लभ साठे उपस्थित होते.
त्यांनी कातळशिल्पांची माहिती दिली. यामध्ये क्लबच्या सायकलस्वारांसह कातळ शिल्प संशोधक, अभ्यासक यांनी सहभाग घेतला. कोळंबे येथील कातळ शिल्प समूह पाहून आपल्या प्राचीन वारशाचा खूप अभिमान वाटला. असा वारसा आपण सर्वांनी मिळून जपला पाहिजे याची जाणीव झाल्याचे सहभागींनी सांगितले. त्यानंतर सायकल चालवत पुन्हा रत्नागिरी शहरात राधाकृष्ण चित्रपट गृहाजवळ कोंकणातील कातळ शिल्प वारसा जतन केंद्राला भेट देऊन सायकलस्वारांनी माहिती घेतली.
या केंद्रात कोकणातील अश्मयुगीन कातळशिल्पांचे वैज्ञानिक अन्वेषण, डिजिटल दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करण्यावर काम करत आहे. रत्नागिरीमध्ये सुधीर रिसबूड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांच्यासह सहकारी प्रचंड मेहनत घेऊन हे काम गेली १४ वर्षे करत आहेत. जागतिक वारसा स्थळांमध्ये यातील कातळ शिल्पांचा समावेश होईल आणि त्यातून कोकणच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कातळाची निर्मिती, कातळशिल्पांची वापरलेली दगडी हत्यारे यासंबंधीची माहिती केंद्रात दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

चौकट १

युनेस्कोच्या यादीत स्थान
कोकणातील ९ कातळशिल्प ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळ दर्जा मिळण्यासाठी संभाव्य यादीत झाला आहेच. भविष्यात आणखी कातळशिल्पांना युनेस्कोच्या यादीत स्थान मिळावे, यातून पर्यटनवाढ, स्थानिक रत्नागिरीकरांमध्ये याबाबत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. यातून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याकरिता निसर्गयात्री संस्था प्रयत्न करत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

---------
चौकट २
शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य दररोज सायकल चालवतात; परंतु दर रविवारी सुमारे २० जण एकत्र येऊन शहर व नजीकच्या भागात सायकल राईड करतात. त्यामधून सायकलिंगची आवड निर्माण झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना रस्त्यावर सायकलिंग करताना वाहतुकीचे नियम कळावेत, तसेच सायकलिंगद्वारे परिपूर्ण व्यायाम नियमित व्हावा याकरिता हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे. त्याला शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे.

---------
कोट
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने आजची आगळी वेगळी सायकल राईड आयोजित केल्यामुळे आम्हा सर्वांना आपल्या जवळच असणारे कातळशिल्प व त्याचा इतिहास, भूगोल अशी माहिती जाऊन घेता आली. आम्ही नेहमी गोळप धारपर्यंत सायकल राईड करतो. या मार्गावरच हे ठिकाण असल्याने अजूनही पर्यटकांना माहिती देऊ.
- गजानन भातडे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

मराठी बिग बॉस सुरु होणार? कलर्स मराठीने शेअर केला व्हिडिओ, नेटकरी म्हणाले...'बिग बॉसचा ६ वा सिझन...'

Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

Nashik Election : भाजपचा बालेकिल्ला, तरी समस्या कायम! पंचवटी प्रभाग ७ मध्ये बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान

Pune Politics:'पुणे जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीची शिवसेनेबरोबर युती'; दौंडमध्ये भाजपची निवडणुकीच्या रिंगणातून माघार..

SCROLL FOR NEXT