06199
जिल्ह्यात उद्यापासून जलसाक्षरता कार्यशाळा
डॉ. प्रशांत कोलते ः सिंधुदुर्ग रोटरी क्लब परिवाराचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २३ ः पाणी व पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर जलसाक्षरतेसाठी पुण्यातील जलअभ्यासक इंजिनिअर सतीश खाडे यांच्या कार्यशाळांचे आयोजन २५ ते २८ नोव्हेंबर दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी केले आहे. कोकणात अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग होत असून यात सिंधुदुर्ग रोटरी परिवारातील एकूण ११ क्लबनी पुढाकार घेतला आहे. ‘रोटरी’चे असिस्टंट गव्हर्नर डॉ. प्रशांत कोलते, सचिन मदने यांनी ही माहिती दिली.
येथील हॉटेल स्पाइस कोकण येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुडाळ ‘रोटरी’चे अध्यक्ष राजीव पवार, खजिनदार राकेश म्हाडदळकर, या चळवळीचे चेअरमन डॉ. लिना लिमये, सचिन मदने, डॉ. विनया बाड उपस्थित होते.
प्रमुख वक्ते खाडे यांनी गेल्या बारा वर्षांत सहाशेहून जास्त व्याख्याने घेतली आहेत. दोन तासांच्या या कार्यशाळेत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, पाणीबचत, सांडपाणी पुनर्वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शास्त्रशुद्ध पद्धतीने भूजल संवर्धन कसे करावे, पाणी शुद्धीकरणाच्या नैसर्गिक पद्धती, वॉटर बजेटींग, पाण्याची गुणवत्ता कशी जपावी, पाण्याचे अंदाजपत्रक कसे मांडावे, पाण्याचे प्रदूषण कसे टाळावे, कांदळवन संवर्धन, सांडपाण्याचे नियोजन या विषयांवर या कार्यशाळेत माहिती मिळणार आहे. जिल्ह्यातील सामाजिक संस्था प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शाळा-कॉलेजचे विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---
जिल्ह्यातील होणाऱ्या कार्यशाळा
भोसले नॉलेज सिटी सावंतवाडी येथे मंगळवारी (ता.२५) सकाळी १० ते १२ व बॅ. खर्डेकर कॉलेज वेंगुर्ले येथे दुपारी २ ते ४, बुधवारी (ता.२६) संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे सकाळी ९ ते ११, छत्रपती शिवाजी अॅग्रीकल्चर कॉलेज ओरोस-सकाळी ११.३० ते १.३०, कणकवली २७ नोव्हेंबर-एस. के. पाटील कॉलेज मालवण, सकाळी १० ते १२ देवगड, २८ नोव्हेंबर-शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय सभागृह खारेपाटण सकाळी ९ ते ११ व एएसपीम कॉलेज ऑफ फार्मसी सांगुळवाडी, वैभववाडी-दुपारी २ ते ४ या कालावधीत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.