कोकण

आंबेड बुद्रुकला सीईओ रानडेंची भेट

CD

आंबेड बुद्रुकला सीईओ रानडेंची भेट
संगमेश्वर : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावाला भेट दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची पाहणी करून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. बचत गटातील महिलांनी श्रमदान करून श्रीमती रानडे यांच्या उपस्थितीत विजय बंधाऱ्याची बांधणी केली. याबाबत बचत गटातील महिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे यांनी विशेष कौतुक केले. आंबेड बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन सप्टेंबर २०२५ पासून केलेल्या कामाची माहिती घेतली. ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती संजीवनी गवंडी यांनी गावात घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी सरपंच सुहास मायगडे, उपसरपंच शोएब भाटकर यांनी अभियानातील सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, अभियान यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुंढेतर्फे चिपळूण शाळेत अन्नदान
चिपळूण : जिल्हा परिषद आदर्श शाळा मुंढेतर्फे चिपळूण येथील शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष वैभव खेतले यांनी सर्व विद्यार्थ्यांना एक दिवस पोषण आहारअंतर्गत मिष्ठान्न आहार व एक दिवस पूरक आहार दिला. त्यांच्या या अन्नदान कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश खेतले, माजी मुख्याध्यापक मुजमिल नदाफ, मुख्याध्यापिका वृषाली सुर्वे यांनी त्यांचे आभार मानले.

संजू वाघमारेंचा संस्थांतर्फे सत्कार
चिपळूण : आकले येथील मोहन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संजू वाघमारे यांना कऱ्हाड येथील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, विद्यानगर येथील ''मुख्याध्यापक महामंडळाच्या'' राज्यस्तरीय अधिवेशनात पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचे औचित्य साधून दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेतर्फे वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नरसिंगराव शिंदे, खजिनदार कौस्तुभ जागुष्टे, हिशोब तपासणीस विजय टाकळे, संचालक रामचंद्र राऊत, विश्वास शिंदे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे ZP निवडणुकीत विजयी उमेदवारांची यादी, कोणत्या पक्षातून कोण जिकलं? वाचा एका क्लिकवर

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या मुलीचा विजय

Satara ZP Result 2026 : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचे खंदे समर्थक ज्ञानदेव रांजणे यांना होमग्राऊंडवर धक्का; पत्नी अर्चना रांजणे यांचा 180 मतांनी पराभव

Navi Mumbai: नवी मुंबईकरांना दिलासा! गावठाण घरांवरील अन्यायकारक दंड रद्द करण्याचा निर्णय; गरजू ग्रामस्थांना न्याय

पंतप्रधानांना धोका; लोकसभेत ओम बिर्ला यांचा सल्ला आणि मोदींचा निर्णय

SCROLL FOR NEXT