कोकण

खेड -शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव धूळखात

CD

खेडमधील शाळादुरुस्तीचे प्रस्ताव धूळखात
२१ वर्गखोल्यांची दूरवस्था ; ३९ लाखांची गरज
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २४ : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत आहे. अनेक शाळांच्या इमारती धोकादायक स्थितीत असल्याने विद्यार्थ्यांना दररोज जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. तब्बल २१ वर्गखोल्या दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यासाठी ३९ लाख रुपयांचा अंदाजित खर्च अपेक्षित आहे; मात्र या दुरुस्तीचे प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर गेल्यानंतरही लाल फितीत अडकले आहेत.
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या दयनीय अवस्थेमुळे पालकांची चिंता वाढली आहे. धोकादायक इमारतीत मुलांना पाठवणे कठीण होत असून, त्यामुळे पालक शहरातील शाळांकडे वळत आहेत. याचाच परिणाम म्हणून काही शाळांची पटसंख्या घटताना दिसत आहे.

चौकट
दुरुस्तीच्या प्रतीक्षेतील शाळा
शाळा वर्गखोल्या अपेक्षित खर्च
खेड शाळा क्र. ३– ४ ८ लाख
कोतवली शाळा क्र.२ २ ३ लाख
नांदगाव (मराठी) – ३ ६ लाख
म्हाळुंगे – २ ४ लाख
तुळशीखुर्द कोंड – १ दीड लाख
संगलट-बौद्धवाडी १ दीड लाख
सुकीवली क्र. १ ४ ७ लाख
कुंभाड नं. १ १ २ लाख
निळीक (मराठी) – १ २ लाख

कोट
खेड येथील शिक्षण विभागाकडून या प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले; मात्र वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्याने शाळांच्या दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गडद होत असून, दुरुस्तीच्या कामांना तातडीने मंजुरी मिळावी.
- संजय विचारे, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: कोल्हापूर जिल्हा परिषद पहिला निकाल बारा वाजेपर्यंत; २५० टेबलांवर मतमोजणी, हातकणंगलेत सर्वाधिक २२ फेऱ्या

Tax Credit Refund : इनपुट टॅक्स क्रेडिट रिफंडबाबत दिलासा

ZP Election Result : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांचा निकाल आज, मिनी मंत्रालयावर कोणाचा झेंडा फडकणार?

ढिंग टांग : दिल का करार हो गया..!

आजचे राशिभविष्य - 9 फेब्रुवारी 2026

SCROLL FOR NEXT