rat24p3.jpg
06358
देवरूख ः मार्लेश्वर येथील टॉवर शोभेचे बाहुले बनला आहे.
--------
मार्लेश्वर पर्यटनस्थळ नॉट रिचेबल
मारळमधील टॉवरमध्ये बिघाड; पर्यटक, विद्यार्थ्यांची गैरसोय
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ः प्रसिद्ध मार्लेश्वर पर्यटनस्थळी नेटवर्कचा प्रश्न अवघड बनला आहे. या ठिकाणी बीएसएनएल कंपनीचे टॉवर आहे; मात्र तो शोभेचे बाहुले बनला आहे. संबंधित कंपनी व लोकप्रतिनिधींकडे याबाबत ग्रामस्थांनी पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील श्री क्षेत्र मार्लेश्वर येथे दरवर्षी असंख्य पर्यटक व भाविक येत असतात; मात्र नेटवर्क सेवेच्या अभावामुळे या पर्यटक व विशेषतः स्थानिक ग्रामस्थ, विद्यार्थी यांना दररोज अनेक प्रश्न उद्भवत आहेत. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी बीएसएनएल कंपनीचा टॉवर उभारण्यात आला आहे. महावितरण विभागाच्या जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे; मात्र तरीसुद्धा या ठिकाणी बीएसएनएल कंपनीची सेवा अद्याप सुरू झालेली नाही.