कोकण

चिपळुणात महामार्गालगतच्या गटारावर टपऱ्यांची गर्दी

CD

rat24p5.jpg-
06360
चिपळूण ः महावितरण कार्यालयाच्या परिसरात अशाप्रकारे अनधिकृत टपऱ्या उभ्या आहेत.
------------
चिपळुणात महामार्गालगतच्या गटारावर टपऱ्यांची गर्दी
बांधकाम विभागाची डोळेझाक; पालिकेच्या भूमिकेवर नाराजी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : शहरातील मुंबई-गोवा महामार्गालगत अतिक्रमणे वाढली आहेत. अनेक ठिकाणी महामार्गाच्या दुतर्फा बांधलेल्या गटारावर टपऱ्या उभ्या केल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने पूर्ण डोळेझाक केले असून, नगरपालिकेचे अशा अनधिकृत व्यावसायिकांना अभय आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चिपळूण शहरात चौपदरीकरणांतर्गत बहादूरशेख चौक ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रिटचा सर्विसरोड बांधला आहे. या रोडलगतच्या गटारावर दिवसेंदिवस अनेक टपऱ्या उभ्या राहत आहेत. अनेक ठिकाणी मच्छी आणि भाजीपाला विक्रीसाठी सर्विसरोडचा वापर केला जातो. त्यामुळे येथे अपघात होण्याचा धोका आहे. टेम्पोमधून होणारी प्लास्टिक साहित्याची विक्री, फळ आणि कपड्यांची विक्रीसुद्धा महामार्गालगत रस्त्यावर होते. पागनाका येथे महावितरणच्या कार्यालय परिसरात चायनीजचे गाडे, भाजीपाला आणि इतर वस्तूंची विक्री सुरू आहे. यातील काही टपर्‍या तर कायमच बंद स्थितीत दिसत आहेत; मात्र काही लोकांनी अनधिकृतपणे या जागा अडकवण्यासाठी त्या ठिकाणी टपर्‍यांची उभारणी केली आहे. शहरातील बहादूरशेख चौक ते कापसाळ विश्रामगृहादरम्यान सर्विसरोडलगतच्या गटारांवर अशा टपर्‍या वाढल्या आहेत. याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. मध्यंतरी, या संदर्भात तक्रार झाल्यानंतर महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येणार होती; मात्र त्यानंतर शहरातील काही ठिकाणी महामार्गालगतची अतिक्रमणे काढण्यात आली. तरीही गटारावर ठिकठिकाणी अंतराअंतराने अनेक टपऱ्या उभ्या राहताना दिसत आहेत.

चौकट

अनधिकृत टपऱ्या असलेले ठिकाण
* बहादूरशेख नाका
* डीबीजे महाविद्यालय परिसर
* शिवाजीनगर बसस्थानक परिसर
* पंचायत समितीचे प्रवेशद्वार
* तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्ग
* महावितरण कार्यालय परिसर
* शासकीय विश्रामगृह परिसर
* पागनाका परिसर
------------
कोट
महामार्गालगत असलेल्या टपऱ्या आणि किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी आम्ही पालिकेला कळवले आहे. काही अनधिकृत विक्रेत्यांना आम्हीही नोटीस दिली आहे. पालिकेने कारवाई केली नाही तर आम्ही कारवाई करू.
- शाम खुणेकर, सहाय्यक अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग चिपळूण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT