कोकण

पर्यावरण जागृतीसाठी ''कोकण ट्रेल'' स्पर्धा

CD

swt253.jpg
06562
ओटवणे ः बैठकीला उपस्थित सचिन बिर्जे, योगेश करंदीकर, जयंत जोशी व रणझुंजार मित्रमंडळाचे कार्यकर्ते.

पर्यावरण जागृतीसाठी ‘कोकण ट्रेल’ स्पर्धा
ग्रीन ट्रेल फाउंडेशनचा उपक्रमः सावंतवाडी येथून शुक्रवारी प्रारंभ
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २५ ः सिंधुदुर्ग ग्रीन ट्रेल फाउंडेशन व सावंतवाडी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी ग्रीन ट्रेल फाउंडेशनतर्फे २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवसीय १०० किलोमीटरच्या वॉकाथॉन ''कोकण ट्रेल २०२५'' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
देशभरातील स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. या वॉकाथॉनचा मार्ग सावंतवाडी आणि वेंगुर्ले तालुक्यांतून जात आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीने या वॉकाथॉनच्या मार्गातील प्रत्येक गावात नियोजन करण्यात येत आहे. हा ट्रेल १०० कि.मी. अंतराचा असून तो ५० तासांत पूर्ण करायचा आहे. याचबरोबर ५० कि.मी. फॉरमॅट देखील उपलब्ध आहे, जो २५ तासांत पूर्ण करायचा आहे. यासाठी देशभरातून अनेक स्पर्धक येणार आहेत.
सावंतवाडी जिमखाना मैदान येथून शुक्रवारी (ता. २८) पहाटे ५.३० वाजता या वॉकाथॉनला प्रारंभ होणार असून तिसऱ्या दिवशी रविवारी (ता. ३०) याच ठिकाणी समारोप होणार आहे. वॉकाथॉनचा मार्ग सावंतवाडी, चराठे, कारीवडे, माडखोल, सरमळे, वेत्ये, न्हावेली, पेंडूर, मातोंड, तुळस, अणसूर, परबवाडा, उभादांडा, सागरेश्वर, वेतोरे, वजराठ, मळगाव आणि सावंतवाडी असा आहे. या वॉकाथॉनच्या प्रत्येक १० कि.मी.वर बावळाट, ओटवणे, माजगाव, सोनुर्ली, तुळस, वेंगुर्ले, खानोली, आडेली, नेमळे, सावंतवाडी या दहा ठिकाणी चेकपॉईंट असून त्या ठिकाणी वैद्यकीय मदत, पाणी, अन्न व सुरक्षेची व्यवस्था आहे. ज्येष्ठ व अनुभवी स्पर्धकांबरोबर चालण्याची संधी स्थानिक जनतेला, पोलिस/सैनिक भरतीची तयारी करणारे होतकरू तरुण व महाविद्यालयीन विद्यार्थी वर्गाला मिळण्यासाठी ग्रीन ट्रेल फाउंडेशनने १० कि.मी. ''फन वाँक'' यासोबतच आयोजित केला आहे. या उपक्रमातून कोकणात पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ग्रीन टेल फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन बिर्जे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ओटवणे येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेच्या नियोजनासंदर्भात बैठकीत फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष बिर्जे, उपाध्यक्ष योगेश करंदीकर, सचिव जयंत जोशी यांनी या स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी रणझुंजार मित्रमंडळाचे रवींद्र म्हापसेकर, सोमा उर्फ बाळा गावकर, बाळा गावकर, शेखर गावकर, गजानन रासम, उमेश म्हापसेकर, मिलिंद म्हापसेकर, नंदू म्हापसेकर, रामदास पारकर, संतोष तावडे, अजित आंगचेकर, आनंद मयेकर, ज्ञानेश्वर मयेकर, किरण गावकर, दीपक गावकर, उमा जाधव, भिकाजी बिले, विश्वनाथ बोर्ये, बाळू गावकर, विजय गवंडे, अनंत तावडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! कर्जमाफीचा निर्णय लवकरच, बावनकुळेंची कोल्हापुरात ग्वाही

VIDEO : कराड–पाटण मार्गावर दारु पिऊन तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा; बोनेटवर बसून गाड्या अडवत घातला गोंधळ, दगडफेकही केली

ईशा केसकरने सांगितलं 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिका सोडण्याचं कारण, म्हणाली...'जीवापाड मेहनत करुनही जर...'

Winter Tips: तुमचेही हिवाळ्यात केस खुप गळतात का? मग घरच्या घरी 'हे' सोपे उपाय

Horoscope Prediction : आठव्या घरात गुरु ग्रहाची छाया! कामधंदा, नातेसंबंध अन् मानसिक शांतीवर होईल गंभीर परिणाम, आजच करा हा सोपा उपाय

SCROLL FOR NEXT