संविधान दिन--------लोगो
- rat२५p१२.jpg-
२५O०६५५७
आंबडवे ः डॉ. बाबासाहेबांच्या मूळगावी बांधण्यात आलेले विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक.
----
डॉ. बाबासाहेबांच्या वाचनशीलतेचा आंबडवेत पुन्हा उजाळा
भावाच्या विवाहातील तो प्रसंग; ‘त्या’ जागेवर उभारा माहितीफलक
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २५ ः संविधान दिनानिमित्त आंबडवे गावातील विशेष ऐतिहासिक प्रसंगांना उजाळा दिला जात आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे मोठा भाऊ आनंद याच्या लग्नासाठी मूळ गाव आंबडवे येथे आले होते; मात्र, समारंभातील गजबज बाजूला ठेवून ते गावाच्या बाहेरच्या मंदिरात शांतपणे पुस्तक वाचनात मग्न झाले होते. हा प्रसंग आजही ग्रामस्थांच्या स्मरणात आहे. यामधून ज्ञानाच्या शोधात मग्न होण्याची त्यांची वृत्ती आणि अभ्यासाची तळमळ आजच्या पिढीसाठी प्रेरणादायक मानली जात आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाचनाचा केवळ छंद नव्हता तर त्यांच्या संपूर्ण जीवनाचे ध्येय होते. लग्नसमारंभापेक्षा पुस्तकाकडे झुकलेले त्यांचे लक्ष हे समाजपरिवर्तनासाठी आवश्यक असलेल्या ज्ञानलालसेचे प्रतीक असल्याचे आंबडवेतील स्थानिकांचे मत आहे. संविधान दिनाचे स्मरण स्थानिक ग्रामस्थ आजही करतात. मोठ्या भावाच्या विवाहातील हा प्रसंग आंबडवेतील तरुणपिढीसाठी नव्या प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. डॉ. बाबासाहेबांनी त्या दिवशी दाखवलेली एकाग्रता आणि जिद्द आपण अभ्यासात, करिअरमध्ये आणि सामाजिक बांधीलकीत लागू केली तर संविधानातील मूल्ये खऱ्या अर्थाने जिवंत ठेवू शकतो, असे मत स्थानिक तरुणांनी व्यक्त केले आहे तसेच डॉ. बाबासाहेब जिथे बसून वाचन करत त्या मंदिर परिसराचे संवर्धन तसेच संविधान दिनानिमित्त त्या ठिकाणी ज्ञानदीप प्रज्वलित करून कायमस्वरूपी माहितीफलक उभारण्याची मागणीही तरुणांनी केली आहे.
---
कोट
आंबडवेतील साध्या; पण महान प्रसंगाची आठवण ही ज्ञानार्जन म्हणून संविधान तयार करणाऱ्याचे सर्वात मोठे शस्त्र होते. ज्ञान आणि ज्ञानाची भूकच डॉ. बाबासाहेबांची खरी शक्ती. या स्मरणातून साजरा होणारा संविधान दिन आंबडवे गावासाठी अधिक अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या ज्ञानाच्या प्रकाशातून स्वातंत्र्य, समानता, बंधुभाव आणि न्याय या चतु:सूत्रीवर आधारित आपली राज्यव्यवस्था देशाला दिली. त्याची पाळेमुळे मूळगावी आंबडवेत विद्यार्थिदशेत पाहायला मिळाली.
- सुदामबाबा सकपाळ, आंबडवे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.