कोकण

गोव्याच्या व्याघ्र प्रकल्पापासून सिंधुदुर्ग सिमा दूर

CD

06618

गोव्यातील नव्या व्याघ्र प्रकल्पापासून
सिंधुदुर्ग सिमा भाग, ‘म्हादई’ मात्र बाहेर

वाघाच्या कॉरिडॉर संवर्धनासाठी डोकेदुखी
शिवप्रसाद देसाईः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २५ः जिल्ह्यालगतच्या गोव्यात नवा व्याघ्र प्रकल्प आकारू लागला आहे; मात्र यात सिंधुदुर्गलगतच्या म्हादई अभयारण्याचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे गोव्याहून सिंधुदुर्गमार्गे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापर्यंत असलेल्या वाघाच्या कॉरीडॉर संवर्धनासाठी ही काहीशी डोकेदुखी ठरणार आहे.
गोव्यात व्याघ्र प्रकल्प हवा की नको? या विषयी शिफारस करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय सक्षम समिती नेमली होती. या समितीने व्याघ्र प्रकल्प अधिसुचीत करण्याची शिफारस केली आहे. याबाबत १५ डिसेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे. या समितीने आपल्या अहवालात कर्नाटकमधील काळी व्याघ्र प्रकल्प आणि सिंधुदुर्गातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा गोव्याचा भाग असल्याने येथे वाघाचा कायम अधिवास असल्याचे मान्य केले आहे. याच मुख्य मुद्यावरून गोव्यात व्याघ्र प्रकल्प उभारण्याची शिफारस केली आहे; मात्र यात नेत्रावळी अभयारण्याचा आणि खोती गाव अभयारण्याचा मिळून २९६.७० चौरस किलोमीटरचा भाग या प्रकल्पाचा कोअर झोन करावा भगवान महावीर अभयारण्यातील उत्तरेकडचा भगवान महावीर राष्ट्रीय उद्यानाचा मिळून १७१.९० चौरस किलोमीटर बफर झोन करावा, अशी शिफारस केली आहे. यात सिंधुदुर्गलगतच्या म्हादई अभयारण्याचा समावेश केलेला नाही. या भागात वाघाचे वास्तव्य असल्याने तोही व्याघ्र प्रकल्पात यावा, अशी मागणी गोव्यातील पर्यावरण अभ्यासकांची होती; मात्र ती मान्य झालेली नाही.
असे होण्याबाबतचे कारण सांगताना म्हादई हे अलिकडच्या काळातील अभयारण्य असल्याने तांत्रिक गोष्टी आड आल्याचे सांगण्यात येते. व्याघ्र प्रकल्पासाठी त्या भागात वाघाचे दिर्घकालीन वास्तव्य आवश्यक असते. म्हादई अभयारण्याची अधिसुचना प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. याच्या सिमांचे रेखांकन अजून झालेले नाही. या अभयारण्यासाठी आवश्यक वस्ती पुर्नवसन प्रक्रियाही अपूर्ण आहे. सिमा ठरेपर्यंत हा भाग व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट करणे शक्य नसल्याचे यातील अभ्यासक सांगतात.
सिंधुदुर्गातील व्याघ्र कॉरिडॉरच्या दृष्टीने ही बाब काहीशी डोकेदुखी ठरणार आहे. सध्या शिफारस केलेला गोव्यातील अभयारण्याचा भाग सिंधुदुर्ग सिमेपासून दूर आहे. म्हादई गोव्याच्या सत्तरी तालुक्यात येते. त्याला लागून दोडामार्ग तालुक्याचा भाग आहे. सध्या या भागात पट्टेरी वाघाचे अस्तित्व आहे. गोव्याचा आकारत असलेला व्याघ्र प्रकल्प काळी (कर्नाटक) आणि महाष्ट्राच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या मध्ये होणार आहे. त्यामुळे गोव्यातील हा नवा प्रकल्प ते सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यांना जोडणारा कॉरिडॉर सिंधुदुर्गातून जाणार आहे. वनशक्ती या संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे मांगेली ते आंबोली हा परिसर व्याघ्र कॉरिडॉर म्हणून संरक्षीत होत आहे. गोव्याच्या प्रकल्पात म्हादईचा समावेश झाला असता तर या कॉरिडॉरला संवर्धनाच्या पातळीवर आणखी बळकटी आली असती.

चौकट
लगतचे व्याघ्र प्रकल्प
* सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सिंधुदुर्गाचा समावेश नसला तरी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील वनक्षेत्राचा यात समावेश होतो. २००८ मध्ये याची निर्मिती झाली आहे.
* उत्तर कन्नड जिल्ह्यातील काळी व्याघ्र प्रकल्प पश्‍चिम घाटातील समृध्द जैवविविधतेचे दर्शन घडवणारा आहे. यात वाघ, हत्ती, ब्लॅक पँथर असे प्रमुख प्राणी असून दांडेली वन्यजीव अभयारण्य आणि अशी राष्ट्रीय उद्यान यांचे क्षेत्र यात समाविष्ट आहे.
* वरील दोन व्याघ्र प्रकल्पांच्या मध्ये असल्याने गोव्यात असा प्रकल्प उभारण्याची शिफारस केली आहे. या दोन प्रकल्पांच्या मधल्या भागात सिंधुदुर्गाच्या सह्याद्रीचा भाग येतो.

कोट
केंद्रीय सक्षम समितीने गोवा व्याघ्र प्रकल्पाबाबत दिलेला अहवाल दबाव तंत्राखाली आहे. २००९ ते २०२० या काळात म्हादईच्या खोऱ्यात दोन बछडे एक निम्न प्रौढ आणि एक वाघीन तसेच आणखी एका वाघाची हत्त्या झाल्याचे प्रकार उघड झाले होते. असे असूनही म्हादई अभयारण्याला व्याघ्र राखीव क्षेत्रात समाविष्ट करण्या संदर्भात सक्षम समितीने बाळगलेले मौन धक्कादायक आहे. म्हादई अभयारण्याला व्याघ्र राखीव क्षेत्राचा दर्जा देणे म्हणजे म्हादईचे अस्तित्व राखणे ठरणार आहे. या अभयारण्यात वाघांचे असलेले अस्तित्व नाकारून हा अहवाल तयार केलेला आहे.
- राजेंद्र केरकर, पर्यावरण अभ्यासक, गोवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: ''24 तासांमध्ये अजित पवारांचा राजीनामा घ्या नाहीतर अमित शाहांच्या दारात बसणार'', अंजली दमानियांचा इशारा

Ind Vs SA 2nd Test : भारताच्या पराभवानंतर विराट कोहलीचा भाऊ गौतम गंभीरवर संतापला; म्हणाला, दादागिरी दाखवली की हेच होतं...

Nitesh Rane : 'ये अंदर की बात है, दीपकभाई हमारे साथ है!' नीतेश राणेंचा सनसनाटी दावा, छुप्या पाठिंब्यामुळे चर्चांना उधाण?

Bird Election 2025 : शहर पक्षी निवडणुकीवर स्थलांतरित पक्ष्यांची नजर; बॅलेटसह डिजिटल प्रचारावर भर, कुठं सुरु आहे निवडणूक?

Video : "माझं तुमच्यावर प्रेम आहे" ईश्वरीने अर्णवला दिली प्रेमाची कबुली; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

SCROLL FOR NEXT