कोकण

जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी उतरवला विमा

CD

जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी उतरवला विमा
आंबा, काजू पिकविमा; ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २६ ः आंबिया बहरातील आंबा, काजू फळपिक विमा योजनेला गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, पुढील पाच दिवसांत अजून दहा हजार बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे.
बदलत्या हवामानामुळे फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरित परिणाम होऊन उत्पादनात घट होते आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान स्वीकारावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून संरक्षण मिळावे आणि नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी कृषी विभागामार्फत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना राबवण्यात येते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात अधिसूचित केलेल्या ८३ महसूल मंडळातील आंबा व काजूपिकांच्या उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण दिले जाते. या योजनेत कर्जदार व बिगरकर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. तसेच खातेदार शेतकरीव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही यांना योजना लागू आहेत; मात्र भाडेपट्टीने शेती करणाऱ्यास नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार पिकविमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. विमा योजना जाहीर झाल्यानंतर आठ दिवसात जिल्ह्यातील २ हजार ७९८ शेतकऱ्यांनी १ हजार ४१५ हेक्टर क्षेत्रावरील विमा उतरवला होता.
सुरवातीला अल्प प्रतिसाद मिळाला होता. यंदा पाऊस उशिरापर्यंत सुरू राहिल्याने हंगाम लांबणीवर पडणार आहे. गेल्या काही दिवसात ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणातील बदलाचा परिणाम आंब्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीपोटी १०० कोटीचा लांभाश सुमारे ३२ हजार बागायतदारांना मिळाला होता; परंतु परतावा जाहीर करण्यास विलंब झाल्यामुळे बागायतदारांनीही यंदा विमा उतरवण्यासाठी शेवटच्या टप्प्यात गर्दी केली होती. आतापर्यंत २२ हजार ५७५ शेतकऱ्यांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी इतक्या बागायतदारांनी विमा उतरवणे अपेक्षित आहे. त्यासाठी दहा हजार बागायतदार कमी पडत आहेत. विमा उतरवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. या कालावधीत बागायतदारांनी विमा काढावा, असे आवाहन केले आहे.

कोट
चालू वर्षी आंबिया बहर योजनेत सहभागाकरिता विमा पोर्टल सुरू केले आहे. अवेळी पाऊस, कमी किंवा जास्त तापमान, वेगाचा वारा किंवा गारपीट (तक्रार नोंदवणे आवश्यक) या हवामान धोक्यांपासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी निर्धारित केलेल्या कालावधीत या योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हा. यामध्ये शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) व ई-पीकपाहणी नोंदणी आवश्यक आहे.
- शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Basketball Player Death : सराव करताना खांब अंगावर पडून बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू; क्रीडा अधिकारी निलंबित!

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

SCROLL FOR NEXT