कोकण

वक्तृत्व, निबंध स्पर्धेत क्रिशा इंदानीला द्वितीय

CD

वक्तृत्व, निबंध स्पर्धेत
क्रिशा इंदानीला द्वितीय
संगमेश्वर ः संगमेश्वर तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि विद्या समिती आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, निबंध स्पर्धेत पैसाफंड इंग्लिश स्कूल संगमेश्वरच्या क्रिशा इंदानी हिने माध्यमिक गटात दोन्ही स्पर्धेत तालुकास्तरावर दुसरा क्रमांक पटकावला आहे. याबरोबरच प्रशालेने चित्रकला आणि कथाकथन स्पर्धेतही उल्लेखनीय यश प्राप्त केले. ही स्पर्धा संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ताम्हाणे येथे मंगळवारी (ता. १८) झाली होती. त्यामध्ये क्रिशाने वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत सहभाग घेतला होता. तसेच चित्रकला स्पर्धेत प्राथमिक गटात हिर पटेल, माध्यमिक गटात रिषभ नरबेकर यांनी अनुक्रमे तृतीय क्रमांक मिळवला. याबरोबरच प्राथमिक गटात कथाकथन स्पर्धेत विजय टकले याला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले आहे.

--------------
तायक्वांदो स्पर्धेमध्ये
साहिल जागुष्टेला सुवर्ण
देवरूख ः तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्यावतीने अहिल्यानगर तायक्वांदो असोसिएशन आयोजित ८वी क्युरोगी व ५वी पुमसे राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ४०० खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व संगमेश्वर तालुका तायक्वांदो अॅकॅडमी अंतर्गत सुरू असलेल्या देवरूख तायक्वांदो क्लबचा साहिल जागुष्टे याने फ्रीस्टाईल पुमसे प्रकारात केले होते. त्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत सुवर्णपदक तर बेसिक पुमसेमध्ये कास्यपदक पटकावले. पी. एस. बने. इंटरनॅशनल स्कूल रत्नसिंधुनगर साडवली येथे साहिलचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार डॉ. सुभाष बने, प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब उपाध्यक्ष संदेश जागुष्टे, क्लब सदस्या रूपाली कदम, अभिमन्यू शिंदे, बेडेकर आदी उपस्थित होते.

------
महायुतीच्या निवडणूक
कार्यालयाचे उद्घाटन
लांजा ः नगरपंचायत निवडणुकीसाठी लांजा येथे महायुतीतर्फे सुरू करण्यात आलेल्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आमदार किरण सामंत आणि लांजा गावचे प्रमुख मानकरी सुधाकर शेट्ये यांच्या हस्ते झाले. लांजा शहरातील कीर्ती महल हॉटेलशेजारी हे कार्यालय सुरू करण्यात आले . या वेळी कमलाकर गांधी, राजू कुरूप, सुभाष कुंभार, मयूर शेडे तसेच इतर सर्व मानकरी उपस्थित होते.

--------
भातवडेकर गुरूजींचे
कोंडगाव येथे प्रवचन
संगमेश्वर ः तालुक्यातील कोंडगाव येथील छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या दत्त देवस्थानच्या भव्य पटांगणात श्री दत्तगुरूंचे चोवीस गुरू या प्रवचनाचे भगवंताच्या साक्षीने व भक्तगणांच्या उपस्थित प्रवचनाची सांगता झाली. आपल्या मधूर वाणीने भक्तांच्या हृदयात भगवंताचे स्थान कायमस्वरूपी राहावे यासाठी प्रवचनकार सचिन भातवडेकर गुरूजी कुडाळ यांनी चार दिवस प्रवचन केले. त्यांनी श्रीकृष्ण, अर्जून, युधिष्टिर, रामायण, भागवत महाभारत, वाल्या कोळी वाल्मिकी यांची उदाहरणे देऊन कधी हास्याची कारंजे तर कधी भावनिक गंभीर प्रसंग सांगून सर्वांना भगवंताच्या भक्तीरसात रमवले. दत्तगुरूंचे चोवीस गुरू कोणते, त्यांना एवढे गुरू कशासाठी असावे, याची उदाहरणे पटवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Basketball Player Death : सराव करताना खांब अंगावर पडून बास्केटबॉल खेळाडूचा मृत्यू; क्रीडा अधिकारी निलंबित!

Fire: भीषण अग्नितांडव! सात इमारतींना आग, १३ जणांचा मृत्यू; ७०० लोकांचं स्थलांतर

संमतीचे शरीरसंबंध म्हणजे अत्याचार नव्हे! 12 महिने दोघांमध्ये संबंध, मग तो बलात्कार ठरतोच कसा?, बॅंक अधिकाऱ्याला न्यायालयाने निर्दोष सोडले; काय झाला युक्तिवाद?

लाचखोर कृषी अधिकाऱ्याच्या घरात ६ पोती कांद्याचे बियाणे! 'लाचलुचपत'च्या अधिकाऱ्यांनी घेतली घराची झडती; शेतकऱ्याने दिलेले ८००० रुपये ठेवले फाईलमध्ये

आवक कमी, तरीही कांद्याला प्रतिक्विंटल १८०० रुपयांपर्यंतच भाव! अतिवृष्टी, थंडीमुळे कांद्याला काजळी; सोलापुरातून गतवर्षीपेक्षा यंदा आवक दोन पटीने घटली

SCROLL FOR NEXT