06792
कणकवलीत पारकरांसह पॅनलला ‘नारळ’
चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण; लोकराज्य पक्षाच्या उमेदवाराला कपबशी
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २६ ः येथील नगरपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्ह वाटप झाले. यात भाजपच्या उमेदवारांना आधीच ‘कमळ’ चिन्ह दिले होते. आज शहर विकास आघाडी तथा क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि आघाडीतील सर्व १७ नगरसेवक उमेदवारांना ‘नारळ’ हे चिन्ह मिळाले आहे. नगराध्यक्षपदाचे लोकराज्य पक्षाचे उमेदवार गणेशप्रसाद पारकर यांना कपबशी तर प्रभाग ९ मधील अपक्ष उमेदवार मधुरा मालंडकर यांना ‘जग’ हे चिन्ह मिळाले आहे.
येथील तहसील कार्यालयात आज चिन्ह वाटप कार्यक्रम झाला. यात कपबशी या चिन्हाची मागणी शहर विकास आघाडी तथा क्रांतीकारी विचार पक्ष आणि लोकराज्य पक्षाने केली होती. त्यामुळे या चिन्हासाठी चिठ्ठी काढण्यात आली. यात लोकराज्य जनता पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार गणेशप्रसाद पारकर यांना ‘कपबशी’ हे चिन्ह देण्यात आले. शहर विकास आघाडी तथा क्रांतीकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर आणि या आघाडीतील १७ प्रभागातील उमेदवारांना ‘नारळ’ हे चिन्ह देण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत चिन्ह वाटप झाले. शहरातील १५ प्रभागांमध्ये आता भाजपचे ‘कमळ’ आणि शहर विकास आघाडीचे ‘नारळ’ हे निवडणूक चिन्ह आहे. प्रभाग ९ मध्ये तिरंगी लढत आहे. यात भाजपच्या मेघा सावंत कमळ चिन्हावर, आघाडीच्या रीना जोगळे ‘नारळ’ आणि अपक्ष मधुरा मालंडकर या ‘जग’ या चिन्हावर आता निवडणूक लढविणार आहेत.
प्रभाग ३ मध्येही तिरंगी लढत आहे. यात भाजपचे स्वप्नील राणे हे कमळ चिन्हावर, आघाडीचे सुमीत राणे यांना ‘नारळ’ तर आम आदमी पक्षाचे संजय पवार हे ‘झाडू’ या चिन्हावर लढत देत आहेत. आम्ही ‘नारळ’ हे चिन्ह स्वीकारलेय. आता नारळ घेऊनच जनतेसमोर जाणार आहोत. नारळ हे शुभचिन्ह आहे. त्यामुळे मतदारापर्यंत हे चिन्ह पोचविण्यासाठी फारच कमी वेळ असला तरी आमच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे. त्यांच्या माध्यमातून हे चिन्ह प्रत्येक मतदारापर्यंत कमी वेळेत पोचवू, अशी ग्वाही शहर आघाडी तथा क्रांतिकारी विचार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.