Rat२७p१०.jpg
२५O०६९५४
मंडणगड ः मैत्री फाउंडेशनच्यावतीने आयोजित संविधान सन्मान सोहळ्यात संविधानगीत गाताना आयएसओ शेनाळे शाळेचे विद्यार्थी.
---
मंडणगडमध्ये संविधान पुस्तकांचे वितरण
मैत्री फाउंडेशन ; संविधान दिनानिमित्त सन्मान फेरी
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः मैत्री फाउंडेशनतर्फे संविधान दिनानिमित्त विविध समाजघटकांना एकत्र आणत ‘संविधान सन्मान सोहळा २०२५’ उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिक, विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमांत मैत्रीने समता बंधुत्वाचा संदेश देत ७५ संविधान पुस्तकांचे वाटप केले.
मैत्री फाउंडेशनच्या या कार्यक्रमाची सुरुवात बुधवारी (ता. २६) सकाळी संविधान सन्मान फेरीने झाली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. आयएसओ शेनाळे शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रास्ताविक समूहगीत व संविधानगीत कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. शाहीर शांताराम भेकत यांनी बाबासाहेबांच्या संविधान निर्मितीवर पोवाडा गायन केले. समाजातील सर्व स्तरांना संविधानाने दिलेल्या हक्कांची आणि जबाबदाऱ्यांची जाण करून देणारे भारतीय संविधान आणि आजची परिस्थिती या विषयावर विधीतज्ज्ञ वक्ते ॲड. अमित चांदोरकर यांनी प्रभावी मार्गदर्शन केले. या वेळी राजेश मर्चंडे, मनोज मर्चंडे, सुशांत मर्चंडे, गटविकास अधिकारी सुनील खरात, गटशिक्षणाधिकारी कल्याणी मुळे, रघुनाथ पोस्टुरे, राजेश गमरे, प्रवीण जाधव व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
प्रमोद जाधव, दयानंद लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. समाजातील विविध जातसमूह, युवा कार्यकर्ते, महिलावर्ग तसेच सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून विविधतेत एकता या मूल्यांचा भक्कम संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम या उपक्रमांतून करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.