कोकण

विद्यार्थ्यांना सिंधू–सरस्वती संस्कृतीचा रोमांचक अनुभव

CD

rat२७p११.jpg-
२५O०६९५८
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना सिंधू–सरस्वती संस्कृतीचा रोमांचक अनुभव.
----
फिरत्या संग्रहालयात मुलांना इतिहासाचा अनुभव
‘म्युझियम ऑन व्हील्स’ ; १९०० विद्यार्थ्यांची उपस्थिती, सिंधू–सरस्वती संस्कृतीच्या प्रतिकृती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : जगातील एक प्राचीन नागरी संस्कृती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधू संस्कृतीची ओळख तळागाळातील विद्यार्थ्यांना होण्यासाठी ‘म्युझियम ऑन व्हील्स’ हा आगळावेगळा उपक्रम गोगटे–जोगळेकर महाविद्यालयात नुकताच पार पडला. भारतीय संस्कृतीची आणि इतिहासाची रोमांचक दुनिया या निमित्ताने अनुभवण्यास मिळाली. त्या काळच्या वस्तूंच्या प्रतिकृती, माहितीचे फलक विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले.
मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘म्युझियम ऑन व्हील्स’ या फिरते संग्रहालय रत्नागिरीतील जवाहर क्रीडांगणावर विद्यार्थ्यांना पाहण्यास ठेवले होते. त्या विशेष बसमध्ये सिंधू–सरस्वती संस्कृतीचे आकर्षक, माहितीपूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण पाहण्यासाठी दिवसभरात १९००हून अधिक विद्यार्थी आणि १०० शिक्षक उत्साहाने दाखल झाले. जीजीपीएस शाळा, बाबूराव जोशी गुरुकुल, रा. भा. शिर्के प्रशाला, नानल गुरूकुल, अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहासाच्या विद्यार्थ्यांसोबतच कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील अन्य विषयांच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या उपक्रमाचे उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये यांच्या हस्ते झाले. या वेळी निशिता पवार, कीर्ती जोगळेकर, अथर्व पवार, प्रणव पाध्ये, सिद्धी मांजरेकर, प्रेरणा शिंदे, जान्हवी जोशी, ओंकार आठवले या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहिले. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे आणि अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे इतिहास विषयाचे शिक्षक निनाद तेंडुलकर यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
-----
चौकट १
प्रतिकृती, नकाशे लक्षवेधी
प्रदर्शनात जगातील आद्यनागरी संस्कृतींपैकी एक असलेल्या सिंधू–सरस्वती संस्कृतीची नेटकी नगररचना, प्रगत शेतीप्रणाली, व्यापारजाळे, हस्तकला, चलनमुद्रा आदी विविध पैलूंचे जिवंत दर्शन अत्यंत आकर्षक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सादर करण्यात आले. उत्खननातील पुरावशेषांच्या प्रतिकृती, नकाशे, चलतचित्रे आणि मॉडेल्स पाहताना विद्यार्थ्यांनी वारंवार आश्चर्य व्यक्त केले. शिवाय, आजवर फक्त पुस्तकांत पाहिलेल्या काही वस्तू, सोंगट्या आणि खेळणी प्रत्यक्ष हाताळता आल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.
----
कोट
‘इतिहासाचे जिवंत दर्शन घेण्याचा आनंददायी अनुभव विद्यार्थ्यांना मिळाला. या अनोख्या संधीचा लाभ शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतला. यातून इतिहासाची गोडी व भारतीय संस्कृतीबद्दल आपल्या मनात आदर निर्माण होईल.’
-डॉ. मकरंद साखळकर, प्राचार्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT