ग्राफिक्स पध्दतीने वापरणे)
ग्राउंड रिपोर्ट-------लोगो
- rat२७p२३.jpg-
२५O०७०२१
मंडणगड ः तीव्र वळणामुळे वाहने लक्षात येत नाहीत नाहीत.
- rat२७p२४.jpg-
२५O०७०२२
मंडणगड ः याच शिरगाव तिठ्यावर होतात सर्वाधिक अपघात.
---
‘शिरगाव तिठा’ बनलाय मृत्यूचा सापळा
उपाययोजनेकडे दुर्लक्ष; सहा महिन्यात तिघांचा बळी, चालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
सचिन माळी ः सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २७ ः आंबडवे-लोणंद राष्ट्रीय महामार्गावर शिरगाव येथील तिठा अपघात केंद्र बनलेला असून, वाहनचालकांसाठी प्राणघातक ठरत आहे. मंडणगड-शेनाळे तसेच शिरगाव-पाट येथून येणारी वाहने शिरगाव तिठ्यावर एकत्र येत असल्यामुळे सतत भीषण दुर्घटना घडत आहेत. वेगवान वाहने, वाढलेले गवत, दिशादर्शक फलकांचा अभाव आणि सुरक्षात्मक उपाययोजना न केल्याने नागरिक जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. लोकांच्या जीविताकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिरगाव परिसरासह येथून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या मतानुसार, शिरगावतिठ्यावर संकेतफलक नाहीत. गतिरोधक किंवा झेब्रा मार्किंग नाही. रस्त्याच्या कडेला दाट गवत असल्यामुळे समोरून येणारे वाहनच दिसत नाही. अचानक वाहन समोर आल्यामुळे गडबड होते आणि अपघात होतात. मंडणगड व शेनाळेकडून उतारावरून वाहने सुमारे १०० हायस्पीडने येतात. पाट किंवा शिरगावकडून रस्ता गाठणाऱ्यांना ती वाहने दिसायलाच उशीर होतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे. रस्त्यावर दररोज शेकडो वाहने धावतात; काही वाहने अवजड (ट्रक, टिपर) असल्याने धोका अधिक होतो. तरीही या तिठ्यासंबंधी कोणतेही वाहतूक सर्वेक्षण, ब्लॅकस्पॉट घोषित करणे, नव्या डिझाइनचा प्रस्ताव किंवा अपघातप्रतिबंधक उपाययोजना अद्याप झालेल्या नाहीत. एकीकडे शून्य अपघात मोहिमेची घोषणा होत असताना प्रत्यक्षात अशा बिंदूंवर उपाययोजना न होणे ही बाब अतिगंभीर आहे.
चौकट १
तीन मोठे अपघात, तिघांचा मृत्यू
शिरगाव तिठ्यावर २१ जून, १८ नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर रोजी तीन मोठे अपघात झाले. त्यामध्ये तिघा जणांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. तर किरकोळ अपघातांची संख्या दर आठवड्याला दोन अशी आहे. या भागात रात्री धुके असल्यामुळे येथील दृश्यमानता कमी होते. त्यामुळे धोका अधिक वाढतो. रस्ते सुरक्षितता अभ्यासकांच्या मते, तिन्ही दिशांनी वाहने एकत्र येताना सिग्नल किंवा वाहतूक नियंत्रणासाठीचे गोलाकार चक्राची (राउंड अबाऊट) आवश्यकता आहे. महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनासाठी वेग नियंत्रक उपाय जसे की, रंबल स्ट्रिप किंवा फलक लावणे आवश्यक आहे. रस्त्याच्या कडेला झाडी गवत असल्यास किमान १००-१५० मीटर अंतरावर स्पष्ट दृष्टीक्षेत्र (क्लिअर व्हिजन झोन) ठेवणे गरजेचे आहे.
*तिठ्यावर हे उपाय करणे गरजेचे
दिशादर्शक व सूचनाफलक
वाहने सावकाश हाका, समोर तिठा आहे, वाहनांना प्राधान्य द्या असे फलक लावावेत.
रिफ्लेक्टर टेप व हाय व्हिजिबिलिटी बोर्ड
वेग कमी करणारे उपाय
रंबल स्ट्रिप्स, रूबरब्रेकर्स
झेब्रा लाईन्स, केंद्र रेषा स्पष्ट करणे
वेग नियंत्रक
रस्त्याकडील साफसफाई
गवत व झाडी किमान १५० मीटरपर्यंत कापणे
चौकाची पुनर्रचना करणे
चौकट २
*तत्काळ उपाययोजनांची गरज
शिरगाव, पाट व आसपासच्या गावातील नागरिकांनी संबंधित विभागांना अनेकवेळा मागणी करूनही उपाययोजना न केल्याचा आरोप होत आहे. शिरगाव तिठा हा आता ब्लॅकस्पॉट म्हणून ओळखण्याची वेळ आली आहे. योग्य वेळी कृती न केल्यास येथील अपघातांची मालिका आणखी भयावह होऊ शकते. सुरक्षिततेच्यादृष्टीने तातडीने उपाययोजना करणे महत्त्वाचं ठरेल अन्यथा हा तिठा आणखी धोकादायक ठरू शकतो.
कोट
राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने चालू आहे. त्याचा फटका जनतेला बसत आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात दोघेजणं मृत पावले आहेत. अपघाताचे खापर चालकांवर फोडून यंत्रणा हात वर करून मोकळी झाली आहे; परंतु महामार्गाच्या कडेला मारलेला खड्डा चालकाने मारलेला नव्हता तर तो ठेकेदाराने मारलेला होता. राष्ट्रीय महामार्गावर बॅरिकेट्स लावणे आवश्यक होते. त्यामुळे चारचाकी उलटत आहे. मोठ्या प्रमाणात उत्खननामुळे कालचे ते दोन बळी गेलेले आहेत. काही ठिकाणी जाणूनबुजून रस्त्याचे काम अर्धवट ठेवण्यात आले आहे. काही ठिकाणी डीपीआरप्रमाणे काम झालेले नाही. याबाबत अनेकवेळा यंत्रणांशी संपर्क साधलेला आहे. या सर्वांचा गांभीर्यपूर्वक विचार होणे गरजेचे आहे.
- कौस्तुभ जोशी, उपाध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती
------
कोट
संघर्ष समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या अडचणी आणि अडथळ्यांबाबत निवेदने दिली होती; मात्र त्या पूर्ण करू असे सांगून वेळ मारून नेली जाते. गावांच्या नावाचे फलक, दिशादर्शक फलक आणि अपघातग्रस्त ठिकाणी कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत.
- अरविंद येलवे, अध्यक्ष, संघर्ष समिती, मंडणगड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.