कोकण

माणगावात २० कोटींचे फळ प्रक्रिया केंद्र

CD

07052

swt276.jpg swt277.jpg
06982, 06983
माणगाव : येथील सामुदायिक फळ प्रक्रिया सुविधा केंद्रात अशा प्रकारे विविध प्रक्रिया करणाऱ्या अत्याधुनिक व महागड्या मशिनरी बसविण्यात आल्या आहेत.

माणगावात २० कोटींचे फळ प्रक्रिया केंद्र
सामुदायिक सुविधेमुळे छोट्या उद्योजकांना मिळणार दर्जेदार प्रक्रिया यंत्रणा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २७ ः माणगाव येथे सुमारे २० कोटी ११ लाख खर्चून केंद्राच्या माध्यमातून सामुदायिक फळ प्रक्रिया सुविधा केंद्र उभारले जात आहे. यामुळे जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योगाला नवे बळ मिळणार आहे. यात निर्यातक्षम दर्जाचा माल तयार करण्याची क्षमता असणारी यंत्रणा असेल. यातून उद्योजकांना स्वतःकडे मशिनरी नसली तरी मँगो पल्प, ज्यूस, कोकम सिरप, कच्ची भाजी प्रक्रिया ते पॅकिंगपर्यंतची सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
माणगाव येथील डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पात नव्याने याची उभारणी होत आहे. डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प, सिंधुदुर्ग औद्योगिक विकास संस्था आणि कोकण सिंधू मल्टीफ्रुट क्लस्टर यांच्या संयुक्त माध्यमातून कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून हे सामुदायिक फळ प्रक्रिया सुविधा केंद्र उभारले आहे. केंद्राच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत हे केंद्र आहे. प्रकल्पाच्या १७ एकरपैकी काही जागेवर हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. यामुळे फळ प्रक्रियेत ‘परफेक्शन’ आणि एक्सपोर्ट’ची हमी छोट्या उद्योजकांना मिळणार आहे. तसेच प्रक्रिया करून उत्पादित केलेला माल बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आवश्यक असलेले ‘एनएबीएल’ हे प्रमाणपत्र देण्याची सुविधाही या ठिकाणी उपलब्ध केली आहे. यासाठी प्रशस्त लॅब उभारली आहे. प्रशिक्षण, शिक्षण आणि मदत या उद्देशाने हा उपक्रम साकारला जात असून जिल्ह्याच्या अर्थक्रांतीतील मैलाचा दगड ठरणार आहे.
तंत्रज्ञान झपाट्याने बदलत असून त्या अनुषंगाने पुढे जाणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धी अंगीकारणे या व्यावसायिक स्पर्धेत टिकण्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही गरज ओळखून या सामुदायिक फळ प्रक्रिया सुविधा केंद्रात अत्याधुनिक मशिनरी आणण्यात आल्या आहेत. छोट्या उद्योजकांना महागडी मशिनरी उपलब्ध करणे आर्थिक दुष्ट्या परवडत नाही. यासाठी त्यांना मानवी शक्तीचा आधार घेत हा व्यवसाय करावा लागतो, परंतु यात खर्च वाढतो. वेळही खूप खर्च होतो. त्यावर हे केंद्र प्रर्याय ठरणार आहे. यात लहान उद्योजकांना ऑटोमॅटिक मशिनरी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी सर्व कच्ची भाजी, कॉन्सन्ट्रेटेड सरबत आणि मँगो पल्प आदींच्या फळ प्रक्रिया करून मिळणार आहेत.
यासाठी लागणाऱ्या इमारतीसह अत्याधुनिक यंत्रसामग्री या ठिकाणी बसविली आहे. या सुविधा २०२६ वर्षांपासून कार्यान्वित होणार असल्याचे डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्पाचे अध्यक्ष सुनील उकिडवे यांनी सांगितले. कोकम सरबत बनविण्यापासून ते आपल्याला आवश्यक असलेल्या कॅनमध्ये, बॉटलमध्ये व्यवसायाच्या नावासह पॅकिंग करून काही वेळात उपलब्ध होणार आहे. याशिवाय अननस ज्यूस, आंब्याचे ‘माझा’, ‘स्लाइस’ यांसारखी सिरस उत्पादने सुद्धा करून मिळणार आहेत. एक ते दीड हजार बॉटल एकाचवेळी तयार होऊन बाहेर पडणार आहेत. याशिवाय कच्ची भाजी तयार करून त्याचे पॅकिंग करून मिळणार आहे. ही तयार केलेली कच्ची भाजी वर्षभर वापरता येणार आहे.
आंबा प्रक्रिया करणारी महागडी मशिनरी बसविण्यात आली आहे. या मशीनमध्ये एका तासात दोन टन आंब्यावर प्रक्रिया होऊ शकते, एवढी क्षमता या मशिनरीची आहे. या मशीनमधून आंब्यावर प्रक्रिया करून बॉटल, टिन तयार केले जाणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना हा मोठा दिलासा मिळणार आहे. फळ प्रक्रिया करून मिळतानाच त्यावर विक्रीसाठी लागणारे प्रमाणपत्र सुद्धा याच ठिकाणी मिळणार असल्याने जिल्ह्यातील फळ प्रक्रिया उद्योजकांना इकडून तिकडे करावी लागणारी धडपड थांबणार आहे. तसेच येथे मोठे कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. या आईसमेटची क्षमता खूप मोठी आहे. अनेक टन माल एकाचवेळी यामध्ये ठेवता येणार आहे.

चौकट
कोकम प्रक्रियेला मिळणार बळ
अलीकडे पाऊस मेच्या सुरुवातीलाच येतो, तर उत्पादित होणारा कोकम मेच्या अखेर तयार होतो. आपल्या जिल्ह्यात उत्पादित होणारा कोकम हा उच्च दर्जाचा आणि लाल रंगाचा आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असते, परंतु पावसामुळे कोकम उत्पादन अलीकडे मिळत नाही. कारण कोकम भिजले की ते खराब होते. मग त्याची घुल तयार करून मिळेल त्या किंमतीला विकले जाते. या फळ प्रक्रिया सुविधा केंद्रात ‘ड्राय होमो’ बसविण्यात आला आहे. पावसात भिजलेले कोकम या ड्राय होमोमध्ये टाकल्यावर ते व्यवस्थित वाळते. त्यानंतर त्यापासून कोकम सरबत, कोकम तयार करता येऊ शकते. हे कोकम २४ तासांत सुकवले जाते. एकावेळी दहा टन कोकम शिकविणारी मशीन बसविण्यात आली आहे. हा सुद्धा जिल्ह्यातील कोकम उत्पादकांना मोठा दिलासा ठरणार आहे.

कोट
फळ प्रक्रिया क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना दर सहा महिन्यांनी उत्पादनाचे टेस्टींग करावे लागते. छोट्या उद्योजकांना यासाठी सद्यस्थितीत जिल्हा बाहेरील ‘एनबीएल’मध्ये धाव घ्यावी लागते. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातच त्यांना एनबीएल प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याचा अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांना लाभ होणार आहे. या ठिकाणी कोणत्याही मालाची विक्री केली जाणार नाही, तर प्रशिक्षण, शिक्षण आणि मदत हाच या संस्थेचा आणि प्रकल्पाचा हेतू आहे. थोडक्यात आम्ही उपलब्ध करीत असलेली सुविधा पक्की आहे. कारण गहू आणि पीठ, दोन्ही व्यावसायिकांचे असणार आहे. केवळ दळून देण्याचे काम आम्ही करणार आहोत.
- सुनील उकिडवे, अध्यक्ष, डॉ. हेडगेवार स्मृती सेवा प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress review meeting chaos : बिहार निवडणुकीत दारुण पराभवामुळे दिल्लीत काँग्रेसच्या आढावा बैठकीत गोंधळ; नेत्यांमध्ये जोरदार वाद!

Santosh Deshmukh Case: फरार कृष्णा आंधळेच्या शोधाबाबत अहवाल सादर करा; न्यायालयाच्या सूचना; १२ डिसेंबरला आरोप निश्‍चिती शक्य

Pune Police : आंदेकर टोळीने उमरटीतून १५ पिस्तुले विकत घेतली;टोळीवर आणखी एक गुन्हा दाखल होणार!

Ghodegaon Theft : घोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्या चोरीप्रकरणी दोन आरोपी अटकेत!

Pune New Police Stations : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ; शहरात पाच नवीन पोलिस स्टेशन्स वाढणार, जाणून घ्या कुठे?

SCROLL FOR NEXT