कोकण

दोडामार्ग ते माणगाव पायी पालखी सोहळा आजपासून

CD

दोडामार्ग ते माणगाव पायी
पालखी सोहळा आजपासून
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २७ ः श्री वासुदेवानंद सरस्वती प्रतिष्ठान दोडामार्गच्या (श्रीपाद श्रीवल्लभ दत्तभक्त परिवार, दोडामार्ग सिंधुदुर्ग) वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दोडामार्ग ते माणगाव श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन उद्यापासून (ता. २८) केले आहे. यंदाचे या सोहळ्याचे आठवे वर्ष आहे.
उद्या सकाळी ९ वाजता माणगावहुन दोडामार्गच्या दिशेने पालखी प्रस्थान, दुपारी १२ वाजता मणेरी दत्तमंदिर येथे आगमन, पालखी पूजन, दुपारी १२.३० वाजता सुरुचीवाडी दोडामार्ग येथे पालखी पूजन, आरती, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद (मिलिंद नाईक व परिवार), ३ वाजता प्रस्थान, ४.३० वाजता आंबेली देऊळवाडी येथे पालखी पूजन (विठोबा पालयेकर, मोहन गवंडे व मित्रपरिवार), ६.३० वाजता आंबेली माणगावकरवाडी दत्तमंदिर येथे आगमन, महाप्रसाद (अशोक माणगावकर), शनिवारी सकाळी ६.३० वाजता गणपती मंदिर येथून प्रस्थान, १०.३० वाजता कळणे येथे आगमन, चहा-पाणी (सुनीता भिसे परिवार), १२.३० वाजता श्री देवी माऊली मंदिर आडाळी येथे पालखी पूजन व दर्शन, दुपारी १.३० वाजता महाप्रसाद (आडाळी ग्रामस्थ मंडळ), सायंकाळी ५.३० वाजता संत सोहिरोबानाथ आंबिये मठ, बांदा येथे पालखी पूजन, आरती (संत सोहिरोबानाथ भक्त मंडळ, बांदा), ६.४५ वाजता दत्तमंदिर इन्सुली तपासणी नाका येथे आरती व पूजन, ७.४५ वाजता संत सोहिरोबानाथ आत्मसाक्षात्कार मंदिर इन्सुली डोबाशेळ येथे पालखी पूजन, आरती, भजन, महाप्रसाद (संत सोहिरोबानाथ भक्तमंडळी इन्सुली), रविवारी (ता. ३०) पहाटे ५ वाजता आरती, पालखी पूजन व माणगावकडे पालखी प्रस्थान, सकाळी ८ वाजता श्री टेंब्ये स्वामी दत्तमंदिर सावंतवाडी खासकीलवाडा येथे पालखी आगमन, पूजन, आरती (श्री टेंब्ये स्वामी दत्तभक्त परिवार), दुपारी १२.३० वाजता माणगाव तिठा येथे पालखी आगमन, पूजन (बंटू भिसे) व प्रस्थान, १.३० ते २.३० पालखीचे श्री टेंब्ये स्वामी जन्मस्थान येथे आगमन, महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता मनोगत व पालखी सांगता. या पालखी सोहळ्याबाबत अधिक माहितीसाठी महेश कासार, नितीन गवस, श्री वासुदेवानंद सरस्वती प्रतिष्ठान दोडामार्ग येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur ZP : महिला मतदारांना वाटायला आणलेल्या साड्या, साडे सहा लाखांचा माल जप्त; टेंपो कुणाचा?

अभिषेक शर्मानं मोडला कॅनडाच्या क्रिकेटरचा विश्वविक्रम, २० चेंडूंच्या खेळीत प्रत्येक चेंडूवर काढली धाव

Solapur News: दिल्ली प्रजासत्ताक दिनात बार्शीच्या पिता-पुत्रास सनई वादनाची संधी; सांस्कृतिक मंत्रालयाकडून खास आमंत्रित!

Panchang 26 January 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

Latest Marathi news Update : BCCIचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंह बिंद्रा यांचं निधन

SCROLL FOR NEXT