कोकण

लहान वयात मुलांना संविधान

CD

rat२७p२०.jpg-
२५O०६९९६
रत्नागिरी : दामले विद्यालयात संविधान दिन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रा. सुधाकर मुरकुटे. डावीकडून गौरी राजपूत, विलास शेंडगे, भगवान मोटे आणि योगेश कदम.

मुलांना संविधान समजावून सांगा ः मुरकुटे
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ : संविधान लहान वयातच मुलांना अतिशय साध्यासोप्या पद्धतीने समजावले तर ते त्यांना अधिक आत्मसात होईल, असे प्रतिपादन रत्नागिरी नगर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी तथा विस्तार अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे यांनी केले. संविधान दिनानिमित्त नगरपालिका शाळा क्र. १५- दामले विद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रा. मुरकुटे यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चर्चेत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करत आजचे मार्गदर्शन यशस्वी केले. ज्याप्रमाणे आपण संविधानाने दिलेल्या अधिकारांविषयी जागरूक असतो त्याचप्रमाणे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक असले पाहिजे, याची जाणीव त्यांनी या वेळी विद्यार्थ्यांना करून दिली.
व्यासपीठावर मुख्याध्यापक भगवान मोटे, विलास शेंडगे, गौरी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेत दिवसभर चित्रकला स्पर्धा, प्रश्नमंजूषा स्पर्धा, गीतगायन स्पर्धा व प्रभात परीक्षा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. योगेश कदम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आपण चुकीच्या दिशेने तर जात नाही ना?’ ; UGC नियमांवर CJI सूर्यकांतांचा थेट सवाल! जुने नियम कायम ठेवण्याचा निर्णय

स्टार प्रवाहनंतर अभिनेत्याची झी मराठीच्या मालिकेतही एंट्री; एकाच वेळी दोन लोकप्रिय सिरीयलमध्ये साकारतोय भूमिका

Latest Marathi News Live Update : अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीचे झालेल्या नुकसानीची आमदार काशीराम पावरा यांनी केली पाहणी

अजिंक्य रहाणे संतापला, पाकिस्तानला सुनावले! म्हणाला, T20 World Cup वर बहिष्काराची भाषा कसली करताय, तेवढा दम...

Asherigad Fort Trek: ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींना आवडेल असा ‘अशेरीगड’ ; कसा पोहोचाल ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT