कोकण

किंजवडेत लोकसहभागातून वनराई बंधाऱ्याची उभारणी

CD

swt288.jpg
07161
किंजवडे : येथील ग्रामपंचायतीच्यावतीने लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

किंजवडे ग्रामपंचायतीतर्फे
वनराई बंधाऱ्याची उभारणी
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत तालुक्यातील किंजवडे ग्रामपंचायतीच्यावतीने लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. किंजवडे गावातून वाहणाऱ्या अन्नपूर्णा नदीवर हा बंधारा बांधण्यात आला आहे. जलसंधारण व शेती विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, येथील तालुका कृषि अधिकारी आरती पाटील, रामेश्वर येथील प्रादेशिक फळ संशोधन उपकेंद्राचे किटकशास्त्रज्ञ डॉ. अजय मुंज, पंचायत समिती कृषी अधिकारी दिगंबर खराडे यांच्यासह सरपंच संतोष किंजवडेकर, उपसरपंच विनय पाडावे, ग्रामपंचायत अधिकारी एच. बी. तेरसे, गुरुनाथ मिठबांवकर तसेच किंजवडे गावातील शाळांचे शिक्षक, सहाय्यक कृषी अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या वनराई बंधाऱ्यामुळे जलसाठा वाढ, भूजल पातळी उंचावणे, ओलित क्षेत्र वाढ आणि शेतीसाठी शाश्वत पाणीस्रोत उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. संतोष किंजवडेकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer News: महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय! डिजिटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Arjun Tendulkar ने इतिहास घडवला, असा पराक्रम जो सचिन तेंडुलकरलाही नाही जमला...

Stock Market Today : रेपो दरातील कपातीमुळे शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 447 अंकांनी वाढला! कोणते शेअर्स ठरले फायद्यात?

Indigo Flight Update: प्रवाशांसाठी खुशखबर! तिकीट रद्दीची पूर्ण परतफेड मिळणार; इंडिगोची मोठी घोषणा!

Women Loan: महिलांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा! १ लाख महिलांना १० लाख रुपयांचे कर्ज मिळणार; लाभ कसा घेता येणार?

SCROLL FOR NEXT