कोकण

७६ प्रकरणात १३ लाखाचे मद्य जप्त

CD

आचारसंहितेत १३ लाखांचे मद्य जप्त
राज्य उत्पादन शुल्क विभाग; ६५ जणांवर कारवाई
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः जिल्ह्यातील चार नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या विविध विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे. या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत अवैध ७६ प्रकरणांमध्ये ६५ आरोपींना अटक केली असून, १३ लाख ८ हजार २७० रुपये किमतीचे २ हजार ७१ लिटर देशी, विदेशी अवैध मद्य जप्त केले आहे.
नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी २ डिसेंबरला मतदान होणार आहे. ३ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुका पारदर्शी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. या कालावधीत अवैध दारू विक्री तसेच दारू निर्मिती आणि अवैध वाहतूक होऊ नये यासाठी येथील राज्य उत्पादन विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे जिल्ह्यातील निरीक्षक अवैध मद्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. या काळात अवैध मद्याची वाहतूक जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर होऊ नये यासाठी डोळ्यात तेल घालून कर्तव्य करत आहेत. या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत या विभागाने ७६ प्रकरणांवर कारवाई करून ६५ जणांना अटक केली आहे. तसेच कारवाईत १३ लाख ८ हजार २७० रुपये किमतीचे देशी-विदेशी २ हजार ७१ लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे.
-----
दृष्टिक्षेपात
* कारवाई : ७६
* अटक : ६५
* कारवाईत जप्त केलेले मद्य : २,०७१ लिटर
* गावठी दारू : १०२.२८ लिटर
* अवैध मद्य : १,९३८ लिटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! India vs Pakistan सामना १५ फेब्रुवारीलाच होणार; मोहसिन नक्वी यांचा खोटारडेपणा उघड

Ajitdada Pawar : बारामती खरेदी-विक्री संघाचे ऐतिहासिक पाऊल; आता 'अजितदादा पवार' नावाने ओळखली जाणार संस्था, संचालक मंडळाचा मोठा निर्णय

Hasan Mushrif : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाबाबत हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...

IIT Bombay Research : रेशीमकिडे न मारता मिळणार रेशीम! IIT बॉम्बेचा 'जीवोदय' प्रकल्प यशस्वी; कोल इंडियाच्या पाठिंब्याने प्रयोग, वाचा सविस्तर

Sensex Today : अवघ्या 20 मिनिटांत शेअर बाजारात 20 लाख कोटींचा नफा! गुंतवणूकदार मालामाल, ऐतिहासिक वाढीमागची ही '3' मोठी कारणं

SCROLL FOR NEXT