कोकण

खेळांमुळे मानसिक आरोग्य चांगले

CD

swt285.jpg
07155
कुडाळ ः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन रणजीतसिंग राणे यांनी केले. यावेळी कल्पना भंडारी, चैताली बांदेकर, अरुण मर्गज, प्रा. नितीन बांबर्डेकर, पल्लवी कामत उपस्थित होते. (छायाचित्र ः अजय सावंत)

खेळांमुळे मानसिक आरोग्य चांगले
रणजीतसिंग राणेः बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेत क्रीडा महोत्सव
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ः खिलाडूवृत्ती वृद्धिंगत करण्याचे महत्त्वाचे साधन म्हणजे खेळ होय. खेळामधील कसरतीमुळे शारीरिकतेबरोबरच मानसिक आरोग्य चांगले राहते. क्रीडांगणातील संघ भावना जीवनात सामाजिक समयोजनाची शिकवण देते, असे प्रतिपादन निवृत्त वन अधिकारी, तथा सिंधुदुर्ग अॅथलेटिक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष रणजीतसिंग राणे यांनी केले
बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध विभागांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘‘शालेय जीवनापासून कोणत्याही क्रीडा प्रकारातील सहभाग प्राविण्य आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी राहण्याचा मूलमंत्र ठरतो. एवढेच नव्हे तर शैक्षणिक ताण-तणावर क्रीडांगणातील आपला वावर मानसिक बळ देतो. म्हणून आपली क्षमता व कुवत पाहून खेळाची निवड करा व त्यात समरसून सहभाग नोंदवा. उमेश गाळवणकर यांच्यासारख्या उज्ज्वल शैक्षणिक व्हीजन घेऊन काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थेमध्ये आपण शिक्षण घेत आहात, ही फार भाग्याची गोष्ट आहे. त्याचा यथोचित लाभ घ्या.’’
यावेळी व्यासपीठावर पालकांच्यावतीने संतोष वालावलकर, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै महिला आणि रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, बॅरिस्टर नाथ पै फिजीओथेरपीचे प्राचार्य डॉ. प्रत्युष रंजन बिस्वाल, बॅरिस्टर नाथ पै बी. एड. कॉलेजचे प्रा. नितीन बांबर्डेकर, पल्लवी कामत, क्रीडा शिक्षक रोहिदास राणे आदी उपस्थित होते.
क्रीडा ज्योत श्री. रणजीतसिंग राणे यांच्या हस्ते प्रज्वलन करून ती विविध खेळांमध्ये विशेष प्राविण्या प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या क्रीडा संचलनाने, विद्यार्थ्यांच्या क्रीडा डान्स ने, आकाशात फुगे सोडून दिमाखदारपणे क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

Latest Marathi News Live Update : कृषी उत्पन्न बाजारपेठ उद्या एक दिवसासाठी बंद!

Video: क्रूरतेचं टोक! कृत्रिम पाय उचलून फेकला, अपंगाला अमानूष मारहाण; जीआरपी कॉन्स्टेबलने सगळ्या मर्यादा ओलांडल्या

'जुबान केसरी म्हण ना…' नवरीची विनंती! शाहरुख खानचा मजेशीर नकार! म्हणाला...'बॅन करतील..'

Dry Fruits Price : काजू-बदाम-अक्रोडचा भाव 'जैसे थे'; जीएसटीत कपात झाली, तरी सुकामेव्याच्या दरात यंदा ग्राहकांना दिलासा नाही

SCROLL FOR NEXT