कोकण

आरएचपी फाऊंडेशनतर्फे दिव्यांग व्यक्तीस व्हील चेअरची मदत

CD

दिव्यांगास ‘आरएचपी’तर्फे व्हीलचेअर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : फणसोप येथील दिव्यांग महिलेला रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनतर्फे (आरएचपी) व्हीलचेअरची मदत करण्यात आली. यामुळे दिव्यांग महिलेला घरातील कामे व घराबाहेर जाऊनही कामे करता येऊ लागल्याने कुटुंबीयांनी संस्थेचे आभार मानले.
फणसोप येथील सुप्रिया राहुल शिंदे असे या महिलेचे नाव आहे. त्या पदवीधर असून वयाच्या तिसऱ्या वर्षी तापात इंजेक्शन दिल्याने उजव्या पायाला पोलिओ झाला. खूप औषधोपचार करून हळुहळू चालायला लागल्या. पाचव्या वर्षी पायावरून ट्रक गेल्याने पायाचा अंगठा काढावा लागला. त्याही परिस्थितीत घरच्यांच्या मदतीने शिक्षण पूर्ण केले. घरी मुलांच्या शिकवण्या घेत होत्या. २०१० मध्ये राहुल शिंदे यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला. तेसुद्धा दिव्यांग आहेत. सौ. शिंदे यांना चालता येत होते, परंतु दोन वर्षांपासून संधिवातचा त्रास सुरू झाल्याने चालणे कमी झाले. डावा पाय भार पडून वाकडा झाला त्यावर भार देता येत नसल्याने घरात घसटत सर्व काम करायला लागायची. आरएचपी फाउंडेशनची माहिती मिळाल्यावर शिंदे यांनी अध्यक्ष सादिक नाकाडे यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर संस्थेतर्फे नवीन व्हीलचेअर सुप्रिया शिंदे यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांना घरातील काम कारण सोपं जाऊ लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup 2026 च्या सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर! ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली संघ तगड्या संघांना भिडणार

Ladki bahin Yojana : केवायसी करुनही पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणी संतप्त, शेकडो महिला थेट बालविकास कल्याण केंद्रात घुसल्या अन्...

Shadashtak Yoga 2026: 13 फेब्रुवारीला तयार होणार षडाष्टक योग! मेष राशींबरोबर 'या' 4 राशींचं नशीब उजळणार

New UPI Feature : आता अकाऊंट मध्ये पैसे नसतानाही ऑनलाइन पेमेंट शक्य! UPI च नवं फीचर पाहिलंत का? तुम्हाला काय फायदा होणार?

बांगलादेशला रिप्लेस करणाऱ्या स्कॉटलंडने T20 World Cup साठी जाहीर केला संघ! पाकिस्तानी वंशाच्या अन् न्यूझीलंडच्या माजी खेळाडूला संधी

SCROLL FOR NEXT