कोकण

जि.प., पं. स. मधील राजकीय हालचालींना वेग

CD

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा रणधुमाळी
स्थगितीचे सावट दूर; जिल्हा परिषद-पंचायत समित्यांच्या इच्छुकांमध्ये वाढली चुरस
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरलेल्या वेळातच म्हणजे ३१ जानेवारीपर्यंत होणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीवरील टांगती तलवार बाजूला झाली असून, इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. रत्नागिरी ५६ गण आणि ११२ गणांसाठी निवडणूक होणार आहे.
आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेल्याने इच्छुकांची घालमेल सुरू होती. मात्र, आता प्रचाराला पु्न्हा वेग येणार आहे.
राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आचारसंहितेची मर्यादा ओलांडली होती. पन्नास टक्केपेक्षा अधिक जागा आरक्षित झाल्या होत्या. त्यावर काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याबाबत, जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी होणार असली, तरी निवडणुका ३१ जानेवारीपर्यंत घेण्यास न्यायालयाने सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आरक्षणाचे उल्लंघन झाले नसल्याने येथे निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. ५६ पैकी १८ जागा आरक्षित केलेल्या आहेत.
जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे आरक्षण निश्चित झाल्यापासून इच्छुकांनी मतदारसंघात जोर-बैठका मारण्यास सुरुवात केली आहे. अनेक जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात इच्छुकांनी घरोघरी गाठीभेटी सुरू केल्या होत्या. पण, आरक्षणाचा मुद्दा पुन्हा न्यायालयात गेल्याने त्यांची घालमेल सुरू होती. मात्र, आता राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. सध्या नगरपालीक व नगरपंचायतीच्या निडवणुका सुरू असून त्यात सर्वच पक्ष व्यस्त आहेत. त्यानंतर जिल्हापरीषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असल्या तरीही इच्छुकांना आतापासूनच फिल्डींग लावण्यास आरंभ केला आहे.

चौकट
निवडणुकांचा बिगुल १५ डिसेंबरनंतर

न्यायालयाने निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला असला, तरी हिवाळी अधिवेशन घ्यावे लागणार आहे. नगरपालिकांचा निकाल ३ डिसेंबरला आहे. त्यानंतर ८ डिसेंबरपासून आठवडाभराचे अधिवेशन घेतले जाऊ शकते. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका साधारण १५ डिसेंबरनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

औद्योगिक क्षेत्रात कोणतीही गुंडगिरी किंवा बेकायदेशीर खंडणी खपवून घेतली जाणार नाही, देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट निर्देश

U19 World Cup: 'अजून खूप दूर जायचंय...' वैभव सूर्यवंशीची विश्वविजेता झाल्यानंतरची पोस्ट चर्चेत

Gangapur Accident News : शिवपूर शिवारात भीषण अपघात, भरधाव कंटेनर-आयशरची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

Ahilyanagar News: अहिल्यानगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर महिलांना मंगळसूत्र काढण्यास सांगितले; देवेंद्र फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

Chandrapur : भाजपकडून ठाकरेसेनेला महापौरसहित पदांची ऑफर, आधी कुणाचा महापौर? प्रश्नावर चर्चा थंडावली

SCROLL FOR NEXT