कोकण

दाभोळे, साखरपा शाळेत शिष्यवृत्ती सराव परीक्षा

CD

दाभोळे, साखरपा शाळेत शिष्यवृत्ती सराव परीक्षा
विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद; मराठी शाळांची घटणारी संख्ये चिंताजनक
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ३०ः संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे व साखरपा परिसरात पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा दोन केंद्रांवर उत्साहात पार पडली. माजी अर्थ व शिक्षण सभापती विलास चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त केतन दुधाणे व सचिन अंकुशराव यांच्यावतीने हा शैक्षणिक स्तुत्य उपक्रम आयोजित केला होता. जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा दाभोळे आणि केंद्र शाळा साखरपा क्र. १ येथे ही परीक्षा घेण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
दाभोळे, देवळे आणि साखरपा येथील विद्यार्थी–विद्यार्थिनींचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी शाळांच्या सतत घटत चाललेल्या पटसंख्येबद्दल चिंता व्यक्त करत या विषयाकडे कोणतेही राजकारण न करता एकजुटीने लक्ष देण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांनी केले. आपली शाळा आपली जबाबदारी, मतभेद बाजूला सारून शाळा कशी प्रगत होईल यासाठी सर्वांनी पुढे यावे,” असे विलास चाळके यांनी सांगितले.
शाळांमध्ये अशा उपक्रमांची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दाभोळे येथे झालेल्या या कार्यक्रमाला माजी सभापती जयसिंग माने, रजनी चिंगळे, तालुका प्रमुख नेत्रा शिंदे, कोंडगाव सरपंच श्रद्धा शेट्ये, सरपंच केतन दुधाणे, उपसरपंच किरण दाभोळकर, शेखर आकटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death : शरद पवार बारामतीत दाखल, हेलिकॉप्टरमधून उतरताच दुर्घटनेची माहिती घेतली

Ajit Pawar Plane Crash: बारामती विमान अपघातात निधन झालेली कॅप्टन शांभवी पाठक कोण?

Ajit Pawar Death News LIVE Updates: सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार बारामतीत दाखल, भावनिक वातावरण

Ajit Pawar Plane Crash : अपघातग्रस्त विमान चालवणारे पायलट नेमके कोण होते? १५ वर्ष विमान चालवण्याचा होता अनुभव

Ajit Pawar: 'पिंपरी-चिंचवड ते बारामती, विकासाची ठसठशीत छाप'; राज ठाकरेंनी आठवला अजित पवारांचा प्रवास, भावनिक पोस्ट करत म्हणाले...

SCROLL FOR NEXT