कोकण

चिपळूण-कुंभार्ली घाट रस्ता बनला मृत्यूचा सापळा

CD

rat30p3.jpg-
07553
चिपळूण ः कुंभार्ली घाटातील रस्ता असा वाहून गेला आहे.
--------------
कुंभार्ली घाट रस्ता बनला धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : खड्ड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पावसाळ्यात वाहून गेल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
संपुर्ण घाट रस्ता वाहनधारकांच्या जिवाची परीक्षा घेणारा ठरत आहे. कुंभार्ली घाटातील रस्ता पावसाळ्यात ठिकठिकाणी वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी वळणावर खोल आणि लांबच्या लांब खड्डे पडले आहेत. या घाट रस्त्यातील खड्ड्याच्या समस्येमुळे वाहतूकदार हैराण झाले आहेत. पावसाळा संपल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाढलेले गवत काढण्याची खरी गरज आहे. या गवतामुळे रात्रीच्यावेळी समोरून येणारे वाहन आणि साईडपट्टी समजत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.

कोट
गेले तीन वर्षे चिपळूण-कराड रस्त्याला आणि गेल्या वर्षभरापासून कुंभार्ली घाटाला कोणी वालीच नाही. ही परिस्थिती पावसाळ्यात ठीक आहे, पण आता तरी उपाययोजना करायला हवी.
- महादेव चव्हाण, चिपळूण ट्रक चालक

कोट
कुंभार्ली घाट रस्त्यावरून अवजड माल वाहतूक सुरु असल्यामुळे रस्ता लवकर खराब होत आहे. आठ दिवसात दुरुस्तीचे काम चालू होईल.
- अरुण मुलाजकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Property: हे कोणालाही अपेक्षित नव्हतं! मुंबईत एवढ्या वेगाने घरे का विकत घेत आहेत? प्रॉपर्टी मार्केटने मोडले सर्व रेकॉर्ड

Latest Marathi News Live Update : पुण्यातील नव्याने झालेला सिंहगड रोड वरचा उड्डाणपूल ६६ ठिकाणी फोडण्यात येणार

MLA Amol Khatal: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा महाविजय निश्चित : आमदार अमोल खताळ; विकासाची गती तीन पटीने वाढली

Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !

स्मृती मंधाना अन् पालाश मुच्छलचा विवाह ७ डिसेंबरला होणार? कुटुंबातील सदस्याने दिली महत्त्वाची अपडेट...

SCROLL FOR NEXT