कोकण

कौशल्य प्रशिक्षण स्वयंरोजगाराचा पाया

CD

swt15.jpg
07755
सिंधुदुर्गनगरी : प्रशिक्षण कार्यक्रमात सुधीर पालव यांनी मार्गदर्शन केले. बाजूला प्राचार्य डॉ. एस. एस. भेंडे, प्रा. गोपाल गायकी व इतर मान्यवर.

कौशल्य प्रशिक्षण स्वयंरोजगाराचा पाया
सुधीर पालवः सिंधुदुर्गनगरीत ‘जन शिक्षण’तर्फे मार्गदर्शन कार्यशाळा
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १ः कौशल्य प्रशिक्षण ही काळाची गरज आहे, हे ओळखून तत्कालीन खासदार सुरेश प्रभू यांनी २५ वर्षांपूर्वी शहरी भागासह ग्रामीण भागात जन शिक्षण संस्थानची स्थापना आवश्यक असल्याचे केंद्र सरकारला सांगितले. त्यामुळेच आज देशभरात २९३ संस्था कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत, असे प्रतिपादन जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव यांनी सांगितले.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्ग आणि छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, किर्लोस यांच्यावतीने सहाय्यक फळे, भाजीपाला प्रक्रिया आणि जतन प्रशिक्षण व पापड, लोणचे आणि मसाला पावडर बनवण्याच्या मूलभूत गोष्टी प्रशिक्षण या प्रशिक्षणाचा उद्घाटन कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या उद‌्घाटनप्रसंगी पालव बोलत होते.
पालव पुढे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गातही जन शिक्षण संस्थानद्वारे लाभार्थ्यांना ३० ते ३५ प्रकारची वेगवेगळी कौशल्य प्रशिक्षणे देण्याचे दरवर्षी कार्य केले जात आहे. आजचे युग हे स्पर्धात्मक युग असून, काळानुरूप आपणातही आवश्यक बदल केले पाहिजेत. ज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. यात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी या प्रवाहाबरोबर स्वतःची प्रगती करणे, ही काळाची गरज आहे. सद्यस्थितीत युवक-युवती यांनी नोकरीच्या मागे न लगता जास्तीत जास्त उद्योजक बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःचा व्यवसाय उभारा.’’
छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर किर्लोसचे प्राचार्य डॉ. एस. एस. भेंडे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या क्षेत्रात शिकण्यासारखे बरेच असून या संधीचा लाभ घेऊन तुमचे भविष्य उज्ज्वल करू शकता, असे सांगून शुभेच्छा दिल्या. प्रा. गोपाल गायकी यांनी, प्रशिक्षणाचा लाभ घेतल्याने आपल्याला पुढील जीवनात कशाप्रकारे फायदा होईल, याची माहिती दिली. यावेळी जन शिक्षण संस्थान सिंधुदुर्गचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गणेश परब उपस्थित होते. या कार्यक्रमाची प्रस्तावना रुजल चव्हाण यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi Vs Goldy Brar : "बनाने वाले मिटाना भी जानते हैं" ; लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गोल्डी ब्रारवर पलटवार!

IND vs SA, 2nd ODI: मार्करमचं शतक अन् द. आफ्रिकेचा भारतावर रोमहर्षक विजय! ब्रेव्हिस-ब्रिट्सकेही चमकले; विराट-ऋतुराजची शतके व्यर्थ

Akola Police : २१ दिवसांची धाडसी शोधमोहीम यशस्वी; हरवलेल्या १४ वर्षीय बालकाचा शोध; अकोला पोलिसांची विशेष कामगिरी!

Dombivli Politics: 'तुम्ही एक घेणार तर आम्ही चार'; फोडाफोडीच्या वादावर भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार, आरोप-प्रत्यारोपांचा महापूर

शुक्रवारी शाळा बंद आंदोलन! शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा; शिक्षकांची नेमकी मागणी काय?

SCROLL FOR NEXT