कोकण

६४ हजार ७६४ मतदार आज करणार मतदान

CD

-rat१p२१.jpg-
२५O०७८०६
रत्नागिरी ः निवडणुकीसाठी मतदान केंद्रावर मोटारीतून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र रवाना करण्यात आली.
----
रत्नागिरीत ६४ हजार ७६४ मतदार
आज मतदान ; नगराध्यक्षपदासाठी ६, नगरसेवकांसाठी १०१ जण रिंगणात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होणार आहे. थेट नगराध्यक्षपद आणि ३२ नगरसेवकपदासाठी ही निवडणूक होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी ६ आणि ३२ जागांसाठी १०१ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून, सुमारे ६९ मतदान केंद्रांवर ६४ हजार ७६४ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कायदा व सुव्यवस्थेसाठी चोख पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. आज रात्री १० वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. आता गुप्त प्रचारावर भर देण्यात आला आहे.
पालिकेच्या या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीसह काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष असे अनेक उमेदवार रिंगणात आहेत. प्रचाराची धूम सुरू असून, अनेक नेत्यांचे दौरे, सभा, कॉर्नर सभा, वैयक्तिक गाठीभेटी होत आहेत. महायुती की, महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार, याकडे नागरिकांचेही लक्ष लागून राहिले आहे. प्रचारासाठी राज्य निवडणूक आयोगाने एक दिवसाची मुदत वाढवून दिल्यामुळे प्रचाराला अधिक गती मिळाली.
या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रावर पोलिस बंदोबस्तासह प्रात्यक्षिकही घेण्यात आली. १५८ पोलिस आणि २४ होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ६९ मतदान केंद्रांवर प्रत्येकी ४ आणि राखीव असे ३९० महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान यंत्राची कर्मचाऱ्यांसमोर प्रात्यक्षिकही करण्यात आली. पालिकेच्या १६ प्रभागांमध्ये ६९ मतदान केंद्र असून, ६४ हजार ७४६ मतदार आहेत. यामध्ये ३१ हजार ३२४ पुरुष तर ३३ हजार ४२१ महिला मतदारांचा समावेश आहे. ३२ जागांसाठी एकूण १०१ उमेदवार तर थेट नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. रत्नागिरीत सर्वात कमी मतदार केंद्र ही प्रभाग तीन मध्ये तर उर्वरित प्रभागात चार ते पाच मतदार केंद्र आहेत. मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. मतदान केंद्रावर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र रवाना झाली.
---
चौकट...
अ. के. देसाई सखी मतदान केंद्र
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे पालिकेच्या निवडणुकीतही अ. के. देसाई शाळेत सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या केंद्रावर सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलिस महिला असणार आहेत तसेच या केंद्राची खास सजावट केली जाणार आहे. मतदान केंद्रावर सेल्फी पॉइंटही ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction live : भारतीय मिचेल स्टार्क! ३० लाखांवरून पोहोचला थेट ८.४० कोटी; कोण आहे Auqib Nabi? पाहा गोलंदाजीचा Video

Stock Market Today : शेअर बाजार लाल रंगात बंद; रुपयाच्या कमजोरीने बाजारात दबाव; वेदांताचे शेअर्स मात्र तेजीत!

Sugar-Free Gajar Gulab Jamun: हिवाळ्यात हेल्दी डिझर्टचा परफेक्ट पर्याय; झटपट बनवा गाजराचे शुगर-फ्री गुलाबजाम

IPL 2026 Auction: काव्या मारनला हवा होता फिरकीपटू, पण राजस्थान रॉयल्सने ७.२० कोटी मोजून मारली बाजी; ठरला महागडा भारतीय

मंत्री कोकाटेंना दणका! २ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, जिल्हा न्यायालयानेही निर्णय ठेवला कायम

SCROLL FOR NEXT