- Rat२p१३.jpg-
२५O०७९७८
मंडणगड: मंडणगड तालुका पत्रकार संघ आयोजित शोकसभेत बोलताना गटविकास अधिकारी सुनील खरात सोबत सचिन माळी, वैभव कोकाटे, मुझफ्फर मुकादम.
समाजाचे प्रश्न मांडताना आरोग्यासही
अग्रक्रम द्या ः सुनील खरात
मंडणगड पत्रकार संघातर्फे विजय पवार यांना आदरांजली
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २ ः समाजातील अस्वस्थता, समस्या आणि वास्तव साहित्य व माध्यमांच्या माध्यमातून मांडताना पत्रकारांनी व्यक्तिगत आरोग्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी सुनील खरात यांनी शोकसभेत केले.
मंडणगड तालुका पत्रकार संघाच्यावतीने नगरपंचायत सभागृहात दिवंगत पत्रकार विजय पवार यांच्या शोकसभेत ते बोलत होते. या प्रसंगी सचिन माळी म्हणाले, मूळचे लांजाचे असलेले विजय पवार हे मंडणगड तालुक्याशी एकरूप झाले होते. प्रशासनाशी योग्य समन्वय, विकासकामांसाठी सातत्याने केलेले पाठपुरावे आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची ओळख होती तर उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे म्हणाले, समाजाचा आरसा म्हणून काम करताना त्यांनी अनेक स्वप्ने पाहिली. ती पूर्ण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, नगरसेवक विनोद जाधव, आदेश मर्चंडे, सुभाष सापटे, माजी उपनगराध्यक्ष राहुल कोकाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुकाध्यक्ष मुझफ्फर मुकादम, प्रा. विष्णू जायभाये, प्रा. धनपाल कांबळे, माजी सरपंच किशोर दळवी आदी उपस्थित होते.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.