-rat२p८.jpg-
२५O०७९७३
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत संकल्प कलामंचने केलेल्या कांचनमृग या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ- सकाळ छायाचित्रसेवा)
----
राज्य नाट्य स्पर्धा----------लोगो
प्रेमाच्या त्रिकोणावर आधारलेले ‘कांचनमृग’
संकल्प कलामंचचे सादरीकरण; रसिकांची दाद
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ः जीवनात प्रेम हे त्याग मागत असते; पण परिस्थितीशी झगडताना दोन कलाकारांमध्ये आलेले प्रसंग आणि त्यांच्या जीवनप्रवासाची कथा लेखक राजेंद्र पोळ यांच्या कांचनमृग संहितेतून लिहिली आहे. राज्य नाट्यस्पर्धेत सोमवारी हा प्रयोग येथील संकल्प कलामंच-रत्नागिरी या संस्थेने स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात केला. तीन कलाकारांच्या अभिनय, नेपथ्यात हे नाटक रंगले.
-----
काय आहे नाटक ?
एक शिल्पकार व दुसरा डॉक्टर, लेखक, नाट्य दिग्दर्शक अशा दोन मित्रांची कहाणी ‘कांचनमृग’ या नाटकात रंगवण्यात आली आहे. डॉ. मनोज यांची कॉलेज जीवनातील मैत्रीण माधवी हिच्याबरोबर प्रेम असते; पण त्यांच्या नात्याला विरोध निर्माण झाल्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकत नाही; पण लग्नाअगोदर डॉ. मनोज आणि माधवी एकरूप झालेले असतात. त्याच दरम्यान, मनोज याचा शिल्पकार मित्र महेश याला माधवी आवडते. कालांतराने, त्या दोघांचा विवाह होतो. महेश आणि माधवीचा सुखाचा संसार सुरू असतो. डॉ. मनोजला कुटुंब नसते. त्यामुळे सतत महेशकडे येणे-जाणे सुरूच असते. डॉ. मनोज हा कुटुंबातील एक सदस्यच बनलेला असतो. बराच काळ झाला तरीही महेश-माधवीला मूल होत नाही. महेश शरीराने सक्षम असतो; पण त्याच्याकडे प्रजननक्षमता नसते, हे तपासणीत डॉ. मनोज याच्या लक्षात येते. महेश आणि माधवी यांचा संसार मूल नसल्यामुळे तणावात असतो. एके दिवशी महेश माधवीच्या नकळत मूल दत्तक घेण्याचा विचार करू लागतो. एकदा मद्याच्या नशेत डॉ. मनोज हा कॉलेज जीवनातील प्रसंग उलगडताना माधवीशी असलेल्या संबंधांविषयी सांगतो. एकदा महेश कामात व्यस्त असताना मनोज मद्य प्राशन करून घरात येतो. तेव्हा माधवीला जुन्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाळा मिळतो. त्याचवेळी मनोज प्रेमाचा अंकुर फुलवण्याचा प्रयत्न करतो. माधवी त्याला नकार देते. जुन्या आठवणी काढू नकोस, असेही सांगते. इकडे मनोज हा महेशला मीरा नावाच्या मुलीशी नादी लावतो. ती महेशची चांगली मैत्रीण होते. महेश कामानिमित्त बाहेरगावी गेल्यावर मनोज घरात येत असतो. मूल नसल्यामुळे हतबल झालेली माधवी मनोजच्या प्रेमाला बळी पडते. कालांतराने ती गरोदर राहते. या सगळ्या गोष्टी महेशला माहिती होतात; पण तो हे सर्व सहन करत असतो. एके दिवशी मनोज मद्यप्राशन करून घरात येतो. माधवीला महेश घरी आहे का, असे विचारतो आणि पुन्हा शरीरसुखाची मागणी करतो. त्या वेळी माधवी महेश पुण्याला गेल्याचे सांगते. मनोज घरात येतो; पण घरात कुणी नसते; मात्र मनोजची वाचाळ बडबड महेश ऐकत असतो. महेश घरातून येतो. मनोजला मद्य देतो. हॉस्पिटलमधील आत्महत्या करणाऱ्या रुग्णांची माहिती घेत असताना डॉ. मनोजला सरबतातून झोपेच्या गोळ्या जास्त देतो. तिथेच तो गतप्राण होतो. डॉ. मनोजला तुझा अंकुर आम्ही पुढे वाढवू, असे सांगतो आणि तिथेच कांचनमृग नाटक संपते. सध्याच्या परिस्थितीमधील वास्तव मांडण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आला आहे.
-------
सूत्रधार आणि सहाय्य
दिग्दर्शक ः गणेश गुळवणी, निर्मिती ः डॉ. दिलीप पाखरे, आशिष पाटील, विनोद वायंगणकर. सूत्रधार ः विनयराज उपरकर. पार्श्वसंगीत ः साहिल शिवगण. नेपथ्य ः चंद्रकांत कांबळे, विनायक अपकरे. प्रकाशयोजना ः धनवंत कासेकर. रंगभूषा ः चंद्रकांत कांबळे, रक्षिता पालव. वेशभूषा ः नंदकुमार भारती. रंगमंच व्यवस्था ः कृष्णकांत साळवी, सत्यविजय शिवलकर. सहकार्य ः संकल्प कलामंचचे सर्व सभासद.
--------
पात्र परिचय
महेश ः ज्ञानेश्वर पाटील, मनोज ः मयूर पाडावे. माधवी ः सुरेखा नाखरेकर.
---
आजचे नाटक
नाटक ः ‘एक्स्पायरी डेट’. सादरकर्ते ः श्री शिवाई सहकारी पतसंस्था मर्यादित, येळवण. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळी ः सायंकाळी ७ वाजता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.