rat2p41.jpg-
O08030
रत्नागिरी ः थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमीडिया शोमुळे दिसणारे मनोहारी दृश्य.
-------------
‘थ्रीडी मल्टीमीडिया’ शो आजपासून
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : थिबापॅलेस येथील थ्रीडी मल्टीमीडिया मॅपिंग शो उद्या (ता. ३) डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सायंकाळी साडेसातला हा शो सुरू होणार आहे, असे पालिकेने कळवले आहे. या शोद्वारे राष्ट्रीय पुरुषांची गाथा आणि महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला जाणार आहे. त्यासाठी २५ कोटीचा निधी मिळाला होता. ऐतिहासिक थिबा पॅलेसला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन ओळख देणे आणि पर्यटकांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न आहे.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून थिबा राजवाडा येथे थ्रीडी मल्टीमीडिया शो कार्यान्वित झाला. त्यामुळे या थिबा पॅलेसला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये आणखी वाढ झाली. राज्यातील हा पहिला थ्रीडी मल्टीमीडिया शो असल्याचे पालकमंत्र्यांनी प्रत्येक वेळी सांगून पर्यटक थिबा राजवाड्याकडे वळवण्यास हातभार लावला. पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासून हा शो बंद होता. मार्च ते मे महिन्यापर्यंत सुमारे दहा हजार पर्यटकांनी या शोचा आनंद घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.