चिपळुणात रविवारी
अंनिसची कार्यशाळा
खेड ः समाजातील अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक व विवेकनिष्ठ विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने खेर्डी (चिपळूण) येथील मानवधर्म सभागृहात रविवारी (ता. ७) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विवेकवादी मूल्यांवर आधारित समाजनिर्मितीत सर्वसामान्यांचा सहभाग वाढावा, यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्रशिक्षणात समाजजागृतीसाठी संवाद, प्रत्यक्ष कामाची पद्धत व कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी, नावनोंदणी व अधिक माहितीसाठी सचिन मोहिते, संदीप गोवळकर यांच्याशी संपर्क साधावा.
लवेलमध्ये आजपासून
विज्ञान प्रदर्शन
खेड ः तालुक्यातील लवेल येथील पद्मश्री डॉ. के. एच. घरडा विज्ञाननगरी व घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ३ ते ५ डिसेंबर या कालावधीमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. याचे उद्घाटन गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार भास्कर जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, गटविकास अधिकारी गणेश मंडलिक, सहायक गटविकास अधिकारी विजय करपे, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी शाळा
बंद आंदोलन
खेड ः विविध मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे शुक्रवारी (ता. ५) शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. टीईटीसंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करणे, १५ मार्च २०२४ चा संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षणसेवक पद रद्द करणे, प्राथमिक शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे १०, २०, ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती येथील शाखेच्या सभेत तालुकाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी सांगितले, कोणत्याही दबावाला बळी न पडता व अफवांवर विश्वास न ठेवता खंबीरपणे शाळा बंद आंदोलन व महामोर्चात सर्व शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.