rat३p२.jpg-
२५O०८१८६
रत्नागिरी : बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषदेची सांगता पीएम उषा राज्य समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले यांचा सत्कार करताना डॉ. मकरंद साखळकर. डावीकडून डॉ. रूपेश सावंतदेसाई, डॉ. सीमा कदम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. अजिंक्य पिलणकर.
---
गोगटे महाविद्यालयाची विद्यापीठाकडे वाटचाल
डॉ. पांडुरंग बर्कले ः बहुविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय परिषद
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने नॅक ए ग्रेड, आयएसओ मानांकन मिळवत २५ युजी विभाग, १५ पीजी विभाग, सात संशोधन केंद्र उभारली आहेत. शासनाच्या विविध योजना, देणगीदारांकडून मदत यामुळे महाविद्यालयाची प्रगती अभिनंदनीय आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम- उषा) ५ अंतर्गत ५ कोटीचे अनुदान ४६ महाविद्यालयांना दिले जाते. या सर्व उल्लेखनीय गोष्टींमुळे गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची विद्यापीठ होण्याकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन पीएम उषा कोकण विभागाचे समन्वयक डॉ. पांडुरंग बर्कले यांनी केले.
महाविद्यालयाच्या वाणिज्य विद्याशाखेतर्फे पीएम-उषाअंतर्गत बहुविद्याशाखीय वाणिज्य व व्यवस्थापन, लेखाशास्त्र व वित्त आणि अर्थशास्त्र यांवरील जागतिक संवाद या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. परिषद हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झाली. मंचावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, वाणिज्य शाखा उपप्राचार्या डॉ. सीमा कदम, विज्ञान शाखा उपप्राचार्या व पीएम उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी आणि परिषदेचे सहनिमंत्रक डॉ. रूपेश सावंतदेसाई, डॉ. सीए अजिंक्य पिलणकर आदी उपस्थित होते.
परिषदेच्या सांगता समारंभावेळी विविध विषयांवर उल्लेखनीय असे शोधनिबंध उत्तमप्रकारे सादर करणाऱ्या विद्यार्थी, प्राध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रातिनिधिक स्वरूपात परिषदेच्या सुयोग्य नियोजन व आयोजन, भारावून टाकणाऱ्या आदरातिथ्याबद्दल भावना व्यक्त केल्या. म्हापसा-गोव्यातील श्रीदोरा काकुलो महाविद्यालयातील डॉ. कवीर शिरोडकर यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला. शेवटी प्राचार्य डॉ. साखळकर यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी घोडदौडीविषयी माहिती देताना या परिषदेचे फलित आपल्याला लवकरच पाहायला मिळेल, असे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.